विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेत जिजामाता महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:23 PM2019-09-24T12:23:07+5:302019-09-24T12:23:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एरंडोल येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेत येथील जिजामाता महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल ...

Jijamata College's Success in University-level Poster Competition | विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेत जिजामाता महाविद्यालयाचे यश

विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेत जिजामाता महाविद्यालयाचे यश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एरंडोल येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेत येथील जिजामाता महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल संस्थेच्यावतीने यशस्वी विद्याथ्र्याचा सत्कार करुन कौतुक करण्यात आले. 
या पोस्टर स्पर्धेत नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील 40 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये पदवी स्तरावरील 40 तर पदव्युत्तर स्तरावरील 19 पोस्टरांचा समावेश होता. स्पर्धेत जिजामाता शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील 12 विद्याथ्र्यानी सहभाग नोंदविला. त्यामध्ये सहा विद्यार्थी पदवी स्तरातील व सहा विद्यार्थी पदव्युत्तर स्तरातील होते. 
यातील एम.ए. मानसशास्त्र वर्गातील सोनाली भरत सोनवणे व शर्मिला अशोक चव्हाण या विद्यार्थिनींच्या ‘बाळंतपणानंतरचे मानसिक आजार’ या विषयावरील पोस्टरला द्वितीय क्रमांक मिळाला. या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे, उपाध्यक्ष डॉ.विक्रांत मोरे, सचिव डॉ.अभिजीत मोरे, प्राचार्य डॉ.टी.ए. मोरे  यांनी कौतुक केले. सर्व विद्याथ्र्याना मानसशास्त्र विभागाचे प्रमुख  डॉ.राजेश मेश्राम, प्रा.भारत                खैरनार, प्रा.हिंमत र}पारखे प्रा.जॉयसी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: Jijamata College's Success in University-level Poster Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.