जिभाऊ एकांकिका राज्य स्पर्धेत रंगमंचावरून कलावंतांचे उपस्थितांच्या मनावर राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:56 PM2020-01-06T12:56:09+5:302020-01-06T12:56:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिभाऊ एकांकिका राज्यस्तरीय स्पर्धेत अंत्यत मार्मिक, विनोदी अशा विविध भूमिका करण्यात आल्या. त्यातून एकांकिकांमधून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिभाऊ एकांकिका राज्यस्तरीय स्पर्धेत अंत्यत मार्मिक, विनोदी अशा विविध भूमिका करण्यात आल्या. त्यातून एकांकिकांमधून काही कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
धिट भूमिका
जळगाव जनता बॅँकेच्या कलापथकामार्फत सादर ‘एका तपासाची गोष्ट’ या एकांकिकेतील राणीसाहेब हे पात्र खमके दाखविण्यात आले. राणीसाहेबांनी काही भूमिका अत्यंत विनोदी भूमिका केली. त्यांच्या या भूमिकेने उपस्थितांचे मनोरंजनही झाले होते. याशिवाय या एकांकिकेतील शांताबाई, प्रधानांची बायको शिपाई यांनी देखील नाट्यरसिंकांच्या मनावर राज केले.
शांत परंतु निणार्यक
जळगाव येथील डॉ.हेमंत कुलकर्णी अॅण्ड समुह या नाट्यसंस्थेमार्फत सादर करण्यात आलेल्या ‘अरण्य’ या एकांकिकेतील शामा हे पात्र अत्यंत शांत परंतु निर्णायक भूमिका घेत होता. तो घरमालकाची सेवा करीत असतानानाही मालकाला काही निर्णय घेतांना आधी शामाचे मत जाणून घेत होता. त्यामुळे घरात शामाच्या निर्णयाला विशेष महत्व दिले गेले. त्यामुळे या भूमिकेनेही लक्ष वेधले.
परिस्थितीवर मात
‘अरण्य’ याच नाट्यप्रयोगात प्रमुख भूमिका करणाऱ्या विठ्ठलने त्याच्यावर व्यंगत्व ओढवते. मूल होत नसल्यामुळे पत्नी त्याला सोडून जात असल्याचाही भाग दाखविण्यात आला. या भागात विठ्ठल हा एकाकी पडला असतानाही काही बाबींवर मात करत असल्याचे दाखविण्यात आले. या नाट्यप्रयोगाचा हा भाग समाजाला प्रेरणादायी ठरला.
भगिनींचे वाढवले मनोबल
इंदौर येथील रंगायन संस्थेमार्फत सादर करण्यात आलेल्या ‘मजार’या एकांकिततील गीता या प्रात्राने नाट्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले. या नाटकातील गीता ही मोठ्या संकटात सापडली होती. तिला सीमावर्ती भागात सैनिकांकडून आधार मिळाला. परंतु तेथेही काहिशा तशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले. परंतु गीता ही धिट राहून समोरिल व्यक्तीच्या आईचा विषय काढत त्या परिस्थितीवर मात करते. यातून उपस्थित भगिनींमध्ये मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.