सत्तेसाठी भाजप व काँग्रेसची रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:22 PM2020-01-09T12:22:10+5:302020-01-09T12:22:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी २३ जागा पटकविल्या असून शिवसेना सात ...

Just like the BJP and the Congress rope for power | सत्तेसाठी भाजप व काँग्रेसची रस्सीखेच

सत्तेसाठी भाजप व काँग्रेसची रस्सीखेच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी २३ जागा पटकविल्या असून शिवसेना सात तर राष्टÑवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. कुठल्याही एका पक्षाला बहुमत नसल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. सत्तेची चावी शिवसेनेच्या हाती असली तरी सध्या तरी शिवसेनेने मौन भुमिका घेतल्याने उत्सूकता अधीकच ताणली गेली आहे. दरम्यान, आदिवासी विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या नियुक्तीनंतर सलामीच्याच निवडणुकीत त्यांच्या प्रतिष्ठेला मात्र या निवडणुकीने धक्का दिला आहे.
स्पष्ट बहुमत न मिळाल्याने जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता स्थापन होते याकडे आता लक्ष लागून आहे. २१ वर्षाच्या कालखंडात ही पाचवी निवडणूक होती. आतापर्यंत चार निवडणुकीत कुठल्या ना कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत होते. यावेळी मात्र सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. भाजपला प्रथमच एवढ्या जागा मिळाल्या असल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे.
निवडणुकीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सूकता होती. कुठल्या पक्षाला बहुमत मिळते. कोण सत्ता स्थापन करतो याकडे लक्ष लागून होते. यावेळीचे राजकारण पुर्णत: खिचडी राजकारण असल्याचे जिल्हावासीयांनी अनुभवले आहे. काही नेत्यांनी आपल्या घरातील सदस्यांच्या निवडीकडे लक्ष दिल्यामुळे इतर गट व गणांच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा फटका संबधितांना बसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
नंदुरबार, शहादा तालुक्यात भाजपने चांगली मुसंडी मारली आहे. नंदुरबार तालुक्यात सात तर शहादा तालुक्यात नऊ जागा मिळाल्या. पण धडगाव तालुक्यात भाजपला एकही जागा मिळू शकली नाही. काँग्रेसने प्रत्येक तालुक्यात आपले अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे.

अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी

जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतीपदासाठी अनेकांनी निवडणुकीपूर्वीच फिल्डींग लावली होती. परंतु अनपेक्षीत निकालांमुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या पाठींब्यावर कोण सत्ता स्थापन करतो त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. नेहमीच नवापूर व शहादा तालुक्याला मिळणारे अध्यक्षपद यावेळी कुठल्या तालुक्याला मिळते याबाबतही उत्सूकतता कायम राहणार आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. काय काय घडामोडी घडतात याबाबत प्रचंड उत्सूूकता लागून आहे.

एक जागेवरून भाजप २३ जागेवर
तर राष्टÑवादी बॅकफूटवर...

आतापर्यंतच्या चार निवडणुकीत भाजपला किमान एक किंवा दोन जागांवर समाधान मानावे लागत होते. परंतु यावेळी भाजपने थेट २३ चा आकडा गाठत सत्ता स्थापनेवर दावेदारी केली आहे. पक्षाला प्रथमच एवढ्या जागा मिळाल्या आहेत.
पाच वर्ष जिल्हा परिषदेवर सत्ता राहिलेल्या राष्टÑवादीला यावेळी अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. नवापूर वगळता संपुर्ण जिल्ह्यात राष्टÑवादीची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला अनेकांनी सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे काँग्रेसची अवस्था दोलायमान होती. परंतु विधानसभेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत देखील पक्षाने संपुर्ण जिल्ह्यात आपले पाळेमुळे घट्ट असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

गावीत व पराडके
कुटूंबियांचे वर्चस्व...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वर्चस्व म्हणजे नंदुरबार तालुक्यातील गावीत घराणे आणि धडगाव तालुक्यातील पराडके घराणे यांनी जास्तीत जास्त सदस्य निवडून आणले. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या घराण्यातील त्यांची पत्नी कुमुदिनी गावीत, त्यांची भावजाई विजया प्रकाश गावीत, पुतणी अर्चना व राजश्री गावीत या निवडून आल्या. तर पराडके घराण्यातील विजय पराडके व गणेश पराडके हे दोन्ही बंधू व त्यांचे काका रवींद्र पराडके हे जिल्हा परिषदेत निवडून आले तर काकू हिराबाई रवींद्र पराडके या पंचायत समितीत विजयी झाल्या.
बंधू, बहिणी आणि पती-पत्नी
यांनी मिळविला विजय
जिल्हा परिषदेत नवापूर तालुक्यातील मधूकर व अजीत नाईक, धडगाव तालुक्यातील विजय व गणेश पराडके, बहिणी अर्चना व राजश्री, पती भरत व पत्नी संगिता गावीत, जेठाणी कुमुदिनी व दिराणी विजया गावीत यांनी या निवडणुकीत विजय मिळविला आहे. तो देखील एक चर्चेचा विषय ठरला आहे.
तिसऱ्यांदा सदस्य
जिल्हा परिषदेत यावेळी तिसऱ्यांदा सदस्य म्हणून निवडून येणाºयांमध्ये माजी अध्यक्षा कुमुदिनी गावीत, माजी अध्यक्ष भरत गावीत, रतन पाडवी हे तिसºयांदा निवडून आले आहेत. तर दहा पेक्षा अधीक सदस्य हे दुसºयांदा जिल्हा परिषदेत निवडून आले असल्याचे चित्र आहे.

Web Title: Just like the BJP and the Congress rope for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.