के. डी. गावीत विद्यालयात पाेस्टर प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:36 AM2021-09-17T04:36:23+5:302021-09-17T04:36:23+5:30
कार्यक्रमासाठी आठवी ते १२ वीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अध्यक्षस्थानी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक बी. एम. चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून ...
कार्यक्रमासाठी आठवी ते १२ वीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अध्यक्षस्थानी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक बी. एम. चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदा पाटील होत्या. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक एस. व्ही. विसपुते यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनाचे मान्यवरांनी परीक्षण केले.
यानंतर एस. एन. पटेल, बी. एम. चव्हाण यांनी ओझोन दिनानिमित्त वसुंधरेचे संवर्धन करणे व उपाययोजना करण्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पी. एस. पाटील, आर. पी. सोनवणे, एम. बी. पाटील, मीनाक्षी पाटील, तसेच प्राध्यापिका नयना पवार, प्राथमिक विभागातील शिक्षिका सविता पाटील, ज्योत्स्ना देवरे, शशिकांत पाटील उपस्थित होते.
आभार उपशिक्षक व्ही. एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजेंद्र राजपूत यांनी परिश्रम घेतले.