१६ मोटारसायकली चोरणारा भामटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:18 PM2020-01-07T12:18:21+5:302020-01-07T12:18:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यासह शेजारील गुजरात राज्यातून मोटारसायकली आणि चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या भामट्यास एलसीबीच्या पथकाने तळोद्यातून ...

केत A motorcycle thief detained | १६ मोटारसायकली चोरणारा भामटा अटकेत

१६ मोटारसायकली चोरणारा भामटा अटकेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यासह शेजारील गुजरात राज्यातून मोटारसायकली आणि चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या भामट्यास एलसीबीच्या पथकाने तळोद्यातून ताब्यात घेतले़ सोमवारी दुपारी झालेल्या य कारवाईनंतर चोरट्याने कबुली जबाब दिल्यानंतर १६ दुचाकी आणि एक चारचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला़
तळोदा बसस्थानक परिसरात एक जण विनानंबर दुचाकी अत्यंत कमी किंमतीत विक्रीचा प्रयत्न करत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने याठिकाणी पाहणी केली असता, चहाच्या टपरीवर संशयित महागडी मोटारसायलकर विक्री करण्याच्या प्रयत्नात दिसून आला़ कर्मचारी त्याच्या जवळ जात असताना पोलीस आल्याचे समजून आल्यानंतर त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला़ संशयिताचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले असता, राजू असे खोटे नाव सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली़ त्याची चौकशी केली असता, त्याने खोजल्या वण्या तडवी रा़ बिजरीगव्हाण ता़ अक्कलकुवा अशी ओळख सांगून धक्कादायक माहिती दिली़
खोजल्या याने गेल्या सहा महिन्यात नंदुरबार शहरातून एक, शहादा येथून दोन, नवापुरातून १, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथून २ तर सारंगखेडा ता़ शहादा येथून बुलेट मोटारसायकल चोरी करुन आणली होती़ याच काळात गुजरात राज्यातील अंकलेश्वर, व्यारा, मांडवी, सुरत येथूनही दुचाकी चोरी करुन आणल्याची कबुली त्याच्याकडून देण्यात आली़ नंदुरबार, दोंडाईचा, शिरपूर आणि गुजरात राज्यातील मांडवी येथून दुचाकी चोरी करताना त्याला संदीप सुनील ठाकरे रा़ ख्वाजा मिया चौक याने साथ दिली होती़ त्यालाही पथकाने ताब्यात घेतले आहे़
दोघांना पथकाने ताब्यात घेत नंदुरबार येथे आणून दुचाकी व चारचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्तीची कारवाई केली आहे़ ही कामागिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनील पाडवी, जितेंद्र अहिरराव, युवराज चव्हाण, मोहन ढमढेरे, सतीष घुले यांच्या पथकाने केली़ त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे़

खोजल्या तडवी याने जळगाव शहरात चोरी करुन तेथून चारचाकी गाडी चोरुन आणली होती़ यासह जळगावातून त्याने तीन दुचाकी चोरी केल्या होत्या़ तळोदा तालुक्यातील कुंडलेश्वर मंदिर परिसरात सध्या तो राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दोघांकडून ताब्यात घेण्यात आलेली वाहने उपनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून ओळख पटवून संबधित मालकांनी ती घेऊन जाण्याचे कळवण्यात आले आहे़ दरम्यान ७ लाख ८० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली आणि चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दोघांना अटक करणाºया एलसीबीच्या पथकाला पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी रोख बक्षिस दिले आहे़ जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढलेल्या घटना लक्षात घेता एलसीबीकडून पथकांची निर्मिती करुन गुन्हेगारांचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: केत A motorcycle thief detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.