करणखेडय़ाच्या व्यापा:याने केली शेतक:याची 20 लाखात फसवणूक

By admin | Published: June 27, 2017 12:54 PM2017-06-27T12:54:33+5:302017-06-27T12:54:33+5:30

करणखेडय़ाचा ‘त्या’ व्यापा:याचा प्रताप : चौकशीसाठी दोघे पोलीसांच्या ताब्यात

Karankhede business: It has done farmer: 20 lakhs of fraud in it | करणखेडय़ाच्या व्यापा:याने केली शेतक:याची 20 लाखात फसवणूक

करणखेडय़ाच्या व्यापा:याने केली शेतक:याची 20 लाखात फसवणूक

Next

ऑनलाईन लोकमत 

नंदुरबार,दि.27 - कापूस उत्पादकांची फसवणूक करणा:या नीलेश पाटील याच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात कोळदे येथील शेतक:याची 20 लाखात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आह़े या प्रकरणी संशयित पोलीस पथकाने दोघांना अटक केली आह़े   
नंदुरबार तालुक्यातील कापूस उत्पादक शेतक:यांकडून कापूस खरेदी करून पैसे न देताच पसार झालेल्या नीलेश पाटील याच्याविरोधात कोळदे येथील भरत शंकर पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ नीलेश मणिलाल पाटील, मणिलाल पाटील दोघे रा़ करणखेडा व लाला राजाराम पाटील रा़ शिंदे यांनी 26 मे 2017 रोजी सकाळी 10 वाजता घरातील 20  लाख 95 हजार 721 रूपयांच्या कापसाची खरेदी केली होती़ शेतक:यांनी वारंवार विचारणा करूनही पैसे न देता नीलेश पाटील हा फरार झाला होता़ नीलेश पाटील या कापूस व्यापा:याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात 17 जून रोजी पळाशी ता़ नंदुरबार येथील शेतक:याची 16 लाख रूपयात फसवणूक केल्याच्या गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल आह़े तसेच कोळदे येथील सात शेतक:यांनी नीलेश पाटील याच्याविरोधात तक्रार अर्ज देऊन 19 लाख रूपयांची फसवणूक केल्याचे म्हटले होत़े

Web Title: Karankhede business: It has done farmer: 20 lakhs of fraud in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.