करणपाडा जिल्हा परिषद शाळा इमारतीला तडे गेल्याने धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:46 PM2019-07-07T12:46:31+5:302019-07-07T12:46:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील वर्ग खोल्यांच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील वर्ग खोल्यांच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने ह्या वर्ग खोल्या धोकेदायक झाल्या असून, सध्या पावसाळा सुरू असल्याने याठिकाणी पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थी ओले होऊ नये म्हणून वर्गात प्लास्टिकचा पाल बांधून विद्याथ्र्याना शिक्षण देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
याबाबत गेल्या चार ते पाच वर्षापासून जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्यकार्यकारी अधिका:यांना निवेदन देवूनदेखील कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबधित प्रशासन याठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यावर लक्ष देईल की? काय अशा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरत असून, याठिकाणी दोन वर्ग खोल्या आहे. यातील एका वर्गखोलीच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने छतावरील काही भागदेखील सरकला असल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरून भिंती कोणत्याक्षणी कोसळून अपघात घडू शकतो अशी परिस्थिती आहे. या वर्ग खोलीला लागून असलेल्या दुस:या वर्ग खोलीत या दोन्ही खोलीतील विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथी र्पयतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. दरम्यान वर्ग खोलीत पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थी ओले होवू नये म्हणून वर्गखोलीत प्लास्टिकचे पाल बांधून विद्याथ्र्याना शिक्षण दिले जात आहे. या पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्याच्या वर्ग खोलीला लागूनच जवळील वर्ग खोलीच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने धोकेदायक स्थितीनिर्माण झाली असल्याचे करणपाडा येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास ईश्वर तडवी, उपाध्यक्ष अरविंद दशरथ पाडवी, सदस्य दिनेश वाडग्या पाडवी, गणेश जयसिंग पाडवी, गौविद्रीबाई शंकर वळवी, तुलसीबाई चोमा पाडवी, लताबाई उदेसिग तडवी, सुनिताबाई फुलसिग वळवी, ललिताबाई राजकुमार वळवी, लताबाई अशोक तडवी यांनी सांगितले.
करणपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून, ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा धोका अधीच वाढला आहे. शाळेचे छप्परदेखील गळके असल्याने पावसाच्या पाण्यापासून संरक्षणासाठी प्लास्टीकचे कागद टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. या इमारतीच्या दुरूस्तीबाबत व संभाव्य धोक्याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे.