अवाढव्य प्रभागातील ‘काटे की टक्कर’ : नंदुरबार पालिका निवडणूक

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: December 11, 2017 12:39 PM2017-12-11T12:39:09+5:302017-12-11T12:40:26+5:30

'Kate Ki Pratikar' in a gigantic region: Nandurbar Palika election | अवाढव्य प्रभागातील ‘काटे की टक्कर’ : नंदुरबार पालिका निवडणूक

अवाढव्य प्रभागातील ‘काटे की टक्कर’ : नंदुरबार पालिका निवडणूक

Next

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सर्वाधिक व्याप्ती असलेल्या, सर्वाधिक मतदारसंख्या असलेला आणि दोन ऐवजी तीन नगरसेवक निवडून देणा:या प्रभाग क्रमांक 19 मधील तिन्ही जागेवरील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. सर्वाच्या नजरा असलेल्या क जागेवरील काँग्रेसचे कैलास पाटील आणि भाजपचे ईश्वर चौधरी यांच्यातील लढत प्रतिष्ठेची राहणार आहे.
शहरातील 19 प्रभागांपैकी 18 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून देण्यात येणार आहेत तर केवळ एकमेव 19 क्रमांकाच्या प्रभागात तीन नगरसेवकांना निवडून दिले जाणार आहे. असा हा प्रभाग शहरातील सर्वात मोठा आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करतांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. तब्बल सात हजार 443 मतदार असलेल्या या प्रभागात तीन हजार 805 पुरुष तर तीन हजार 638 महिला मतदार आहेत. 
अवाढव्य प्रभाग 
प्रभागाची व्याप्ती मोठा मारूती मंदीरापासून धुळे रस्त्याने धुळे चौफुली, वळण रस्त्याने जानता राजा चौक ते थेट तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कुंपनाच्या भिंतीर्पयत तेथून थेट शहर हद्दीने वाघेश्वरी मंदीराच्या पायथ्यार्पयत तेथून धुळे रस्त्याने कृषी महाविद्यालयार्पयत तेथून निलेश लॉन्सपासून भोणे रस्त्यावरील फरशीर्पयत तेथून थेट धुळे चौफुली, कोकणीहिल, कामनाथ महादेव मंदीर, संजय नगर, बुस्टर पंप, गवळीवाडाची सिमा आणि तेथून परत मोठा मारुती मंदीरार्पयत असा हा प्रभाग आहे.
विकास आणि कामे
या प्रभाग क जागेवर विद्यमान नगरसेविका वंदना पाटील यांचे पती कैलास पाटील व विद्यमान नगरसेवक ईश्वर जयराम चौधरी यांच्यातील लढत प्रतिष्ठेची ठरली आहे. दोन्ही जणांनी नगरसेवक असतांना केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. कैलास पाटील हे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निष्ठावान असल्यामुळे त्यांनी कामांचा सपाटा लावला होता. याशिवाय सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर आहेत. कुणबी पाटील युवा मंचचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक सामाजिक कार्य या भागात केली आहेत. शिवाय प्रभागातील समाज आणि नातेगोते त्यांच्या कामी येणार आहे. युवा फौज देखील त्यांच्या मागे मोठी आहे. 
ईश्वर चौधरी यांनी देखील आपल्या परीने गेल्या पाच वर्षात या भागात जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रय} केला आहे. आपल्या स्वभावाच्या बळावर नागरिकांची पालिकेतीलच नव्हे तर वीज मंडळ, महसूल विभागाची कामे देखील करवून देत समस्या सोडविल्या आहेत. 
दोन महिला जागा
या प्रभागात दोन जागा या महिलांसाठी राखीव आहेत. काँग्रेसतर्फे एका जागेवर विद्यमान नगरसेविका आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोहितसिंग राजपूत  यांच्या आई भारतीबाई अशोक राजपूत तर दुस:या जागेवर युवा कार्यकर्ते अविनाश माळी यांच्या    आई मंगलाबाई माळी या उमेदवार आहेत.  भारतीबाई राजपूत यांच्या विरोधात भाजपतर्फे सोनल राकेश पाटील तर मंगलाबाई माळी यांच्या विरोधात रेखा सुरेश माळी या रिंगणात आहेत. 
अविनाश माळी यांनी युवक संघटनेच्या माध्यमातून या भागातील सामाजिक कामे मोठय़ा प्रमाणावर केलेली आहेत. त्यामुळे युवकवर्गाची साथ त्यांना मिळणार आहे. मोहितसिंग राजपूत हे नंदुरबार लोकसभा काँग्रेस युवा आघाडीचे अध्यक्ष असून त्यांचे वडिल अशोक राजपूत हे देखील जनसामान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर परिचित आहेत. त्यामुळे त्याचा फायदा अनुक्रमे मंगलाबाई माळी व भारतीबाई राजपूत यांना मिळण्याची आशा   आहे. 
भाजपच्या रेखा माळी यांचे पती सुरेश माळी हे शिक्षण क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तीमत्त्व आहे. अनेक वर्ष ते जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष होते. त्यामुळे ते या भागात परिचित आहेत. सोनल राकेश   पाटील यांचे पती राकेश पाटील हे देखील सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
जात-समाज आणि नातेगोते
प्रभागात जात-समाज आणि नातेगोते हे देखील प्रभावी ठरणार आहे. मराठा-पाटील समाज तब्बल दोन हजारापेक्षा अधीक आहे. त्या खालोखाल माळी समाज 430, राजपूत समाज 400, आदिवासी समाज 450, चौधरी समाज 350 आणि अनुसूचित जातीचे जवळपास 250 मतदारांसह इतर समाजाचे देखील मतदार या प्रभागात आहेत. मराठा-पाटील समाजाचे मतदान कसे फिरते त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. 

Web Title: 'Kate Ki Pratikar' in a gigantic region: Nandurbar Palika election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.