नवापूरात रंगला काव्यमहोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 06:51 PM2019-02-12T18:51:29+5:302019-02-12T18:51:38+5:30
नवापूर : शहरात काव्यप्रेमी शिक्षक मंचतर्फे दोन दिवसीय काव्य महोत्सव घेण्यात आला़ विविध मान्यवरांनी कवितांचे सादरीकरण केले़ महोत्सवाचे उद्घाटन ...
नवापूर : शहरात काव्यप्रेमी शिक्षक मंचतर्फे दोन दिवसीय काव्य महोत्सव घेण्यात आला़ विविध मान्यवरांनी कवितांचे सादरीकरण केले़
महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक यांच्याहस्ते करण्यात आले़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ़पितांबर सरोदे प्रसंगी नगराध्यक्षा हेमलता पाटील, जिल्हा परिषद सदस्या संगिता गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, अजय पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, जेष्ठ साहित्यिक निंबाजीराव बागुल, जेष्ठ साहित्यिका मंगला रोकडे, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, काव्यप्रेमी शिक्षकमंच राज्याध्यक्ष आनंद घोडके, विकास राऊत, विशाल अंधारे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वळवी, राजेंद्र साळूंखे, शिवाजी साळूंखे सुनिता पाटील, कवयित्री लता पवार, कालिदास चवडेकर, ज्येष्ठ साहित्यिक काशिनाथ भारंबे, अशोक शिंदे, प्रमोद बाविस्कर, कृष्णा शिंदे, संदीप वाघोले, दिपक सपकाळ, मृदृला भांडारकर, प्रा़ मुरलीधर उदावंत, विजय बागुल उपस्थित होते़ काव्यमहोत्सवात काव्यशलाका, काव्यरंग, खान्देशी कविता, काव्यरजनी आदी चार सत्रात कवींनी कवितांचे सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले़
प्रारंभी हस्ते काव्यप्रेमी शिक्षकमंच तर्फे पाच पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जया नेरे, विजया पाटील, सरला साळूंखे, अरविंद वसावे, वासुदेव पाटील यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले़
सुत्रसंचलन महेंद्र पाटील,विष्णू जोंधळे, प्रविण पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी राहुल साळूंखे, राजेंद्र साळूंखे, निंबाजी नेरे, शरद नेरे, पंकज वानखेडे, हर्षल नेरे, कपिल नेरे, प्रसाद नेरे, देवेन साळूंखे, हिमांशू पाटील, महेंद्र पाटील, महेश पुरकर, विजय बागुल, जागृती पाटील, करणसिंग तडवी, प्रशांत पाटील, लक्ष्मीपुत्र उप्पिन आदींनी परिश्रम घेतले़