दुर्गम भागात केरोसिन एक रूपयाने महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:19 PM2017-08-09T13:19:12+5:302017-08-09T13:20:07+5:30
केरोसिनबाबत तक्रारी : मागणीपेक्षा दर महिन्यात पुरवठा कमीच
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 9- कधी काळी जिल्ह्यात रस्तोरस्ती दिसणा:या केरासिनच्या रांगा इतिहासजमा झाल्या असल्या तरीही जिल्ह्यात दोन लाख व्यक्तींना आजही रॉकेल जीवनवश्यक आह़े अत्यंत निकडीच्या या केरोसिनचे दर दुर्गम भागात एका रूपयाने अधिक असल्याने आदिवासी बांधवांना ते परवडेनासे झाले आह़े
राज्यातील सर्वाधिक कमी गॅस कनेक्शन असलेला दुस:या क्रमांकाचा जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आह़े जोडण्या वाढवण्यासाठी एकीकडे योजना राबवण्यात येत असली, तरी दुस:या पर्यायी स्त्रोतांकडे मात्र दुर्लक्ष होत आह़े जिल्ह्यात पुरवठा करण्यात येणारे केरोसिन नेमके धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यात एक रूपया 10 पैशांनी महाग आह़े विशेष म्हणजे दर 15 दिवसांनी शासनाकडून एका लीटरमागे 25 पैश्यांमध्ये वाढ करण्याचे धोरण स्विकारले गेले आह़े यामुळे येत्या काळात केरोसिन महागणार आह़े
नंदुरबार तालुक्यात 30 हजार 249 नागरिकांना 102 किलोलीटर, नवापूर 45 हजार 827 नागरिकांना 108 किलो लीटर, शहादा 53 हजार 743 नागरिकांना 198 किलोलीटर , तळोदा 24 हजार 794 नागरिकांना 90 किलोलीटर, अक्कलकुवा 43 हजार 162 नागरिकांना 162 तर धडगाव तालुक्यात 25 हजार 787 नागरिकांना 84 किलोलीटर केरोसिन दर महिन्याला पुरवठा करण्यात येतो़
एका व्यक्तीला दोन लीटर, दोन व्यक्तींना तीन आणि तीनपेक्षा अधिक व्यक्तींना चार लीटर केरोसिन पुरवठा दर महिन्याला देण्याचे शासनाने निर्धारित केले आहेत़ त्यानुसार जिल्ह्यात वाटप करण्यात येत आह़े
धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा या तीन तालुक्यातून स्थलांरित होणा:या मजूरांचे शिल्लक तसेच एखाद्या महिन्याला केरोसिन न घेणा:या लाभार्थीला थकीतत केरासीन परवानाधारक देत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत़ याकडेही गांभिर्याने लक्ष देण्याची अपेक्षा जिल्ह्यातील लाभार्थीची आह़े