खाकी वर्दीतील माणुसकीचे तळोद्यात घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 03:12 PM2018-08-05T15:12:58+5:302018-08-05T15:13:03+5:30

मदतीचा हात : मोठय़ा रकमेसह असलेल्या वृध्दास घरी पोहचवण्यास मदत

Khaki uniforms happened in Pallode in humanity | खाकी वर्दीतील माणुसकीचे तळोद्यात घडले दर्शन

खाकी वर्दीतील माणुसकीचे तळोद्यात घडले दर्शन

Next

रमेशकुमार भाट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : पोलीस कर्मचारी विलास मगन पाटील यांच्या रुपात खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन तळोद्यात घडल़े 85 वर्षिय वयोवृध्द व्यक्तीसह त्यांच्या जवळ असलेली 2 लाख 70 हजार रुपयांची रोकड सुरक्षित घरी पोहचती करुन पाटील यांनी आपले कर्तव्य तर बजावलेच परंतु अद्याप माणुसकी शिल्लक असल्याची प्रचिती दिली़ 
दिवस शनिवाऱ वेळ होती दुपारी साडेबाराची़ स्टेट बँक ऑफ इंडियातून 85 वर्षीय कृष्णासा कलाल यांचे थरथरणारे पाय एक-एक पाय:या खाली उतरत होत़े डोळ्यात काहीशी असुरक्षितता तर मनात आपण घरार्पयत सुखरुप पोहचू ना.. अशी धाकधूक़ 50 रुपयांच्या नोटा असलेले तब्बल 2 लाख 70 हजारांचे बंडल धरलेले हात छातीपासून वेगळे होईनात़ 
तळोद्यातील वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी विकास पाटील हे  भरणा करण्यासाठी जात असता त्यांच्या नजरेत कृष्णासा कलाल हे पडल़े कलाल यांची कासावीस बघता ते काही अडचणीत तर नाहीत ना? असा प्रश्न विकास पाटील यांना पडला़ त्यांनी भरण्याचे काम टाळत कलाल यांची आस्तेवाईक विचारपुस केली़ कुठे राहतात, सोबत कोण आहे, कुठे जायचे आहे, आदी विचारपुस केल्यानंतर बाबा एकटेच असून भलीमोठी रक्कम हाती आह़े एकीकडे शहरात चोरी, लुटीच्या घटना घडत असताना कलाल यांना एकटे सोडणे बरोबर होणार नसल्याचे त्यांना कळून चूकल़े त्यामुळे त्यांनी समयसूचकता पाळत हाती असलेले काम सोडत, पहिले रकमेसह कलाल यांना त्यांचे वास्तव्य असलेल्या तळोद्यातील संत सावता माळी भवनाजवळ त्यांच्या घरी सोडल़े घरी पोहचल्यानंतर कृष्णसा कलाल यांचे डोळे पानावलेले होत़े कलाल यांचा मुलगा विलास कलाल यांनेही विकास पाटील यांचे आभार मानल़े कलाल यांनी केलेल्य कामगिरीबद्दल फौजदार यादव भदाणे, वाहतुक शाखेचे सहाय्यक फौजदार एस़एस़ मुन्शी यांनी विकास पाटील यांचा गौरव केला़ 

Web Title: Khaki uniforms happened in Pallode in humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.