खापरनजीक 2।। लाखाची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 04:17 PM2019-02-03T16:17:42+5:302019-02-03T16:17:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पंजाब आणि मध्यप्रदेश बनावटीचा अवैध दारूचा साठा उत्पादन शुल्क विभागाने खापरनजीक जप्त केला. दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पंजाब आणि मध्यप्रदेश बनावटीचा अवैध दारूचा साठा उत्पादन शुल्क विभागाने खापरनजीक जप्त केला. दोन लाख 37 हजार रुपये किंमतीची दारू व अडीच लाखांचा ट्रक असा चार लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर गस्त घालत असतांना शुक्रवारी रात्री पथकाला खापर नजीक संशयीत वाहन (क्रमांक एमएच 39-सी 7306) जातांना दिसले. पथकाने वाहन अडविण्याचा प्रय} केला असता चालक वाहन सोडून अंधारात पसार झाला. पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले मद्य आढळले. पंजाबमध्ये निर्मित मद्य होते. त्यात 48 खोक्यांमध्ये व्हिस्कीच्या दोन हजार 304 बाटल्या आढळल्या. याशिवाय मध्यप्रदेश राज्यात निर्मित बियरच्या टीनचे तीन खोके असा एकुण दोन लाख 37 हजार 600 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय अडीच लाखांचा ट्रक असा एकुण चार लाख 87 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक पळून गेल्याने हा मद्यसाठा कुठून कुठे जात होता, कुणाच्या मालकीचा आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुव्रे, जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक प्रकाश गौडा, ए.देशमाने, दुय्यम निरिक्षक शैलेंद्र मराठे, मनोज संबोधी, अतुल शिंदे, जवान भूषण चौधरी, तुषार सोनवणे, निलेश शेळके, हितेश जेठे, भट्टाचार्य बागले, हेमंत पाटील, हंसराज चौधरी, धनराज पाटील, अजय रायते यांनी केली.