दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:47 PM2018-04-23T12:47:38+5:302018-04-23T12:47:38+5:30

शेतकरी पाण्यापासून वंचित : मेनगेटला भगदाड, गाळ साचल्याने जलसाठय़ावर परिणाम

Khaparkheda dam damn useless due to repair | दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी

दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 23 : खापरखेडा, ता.शहादा येथील रंगूमती नदीवर असलेल्या धरणात पूर्णपणे गाळ भरला गेल्याने व नादुरुस्त पाटचा:यांमुळे हे धरण निरुपयोगी ठरत आहे. या धरणात साचलेल्या गाळामुळे पाण्याचा साठा होत नसल्याने शेतक:यांना पाण्यापासून वंचित रहावे लागत  आहे.
खापरखेडा येथे रंगूमती नदीवर 1970 मध्ये मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची वेळोवेळी दुरुस्ती होत नसल्याने व पूर्णपणे गाळाने भरल्याने पाण्याचा साठा होऊ शकत नाही. हे धरण सद्यस्थितीत तलावासारखे वाटते. परिसरातील सुमारे 700 एकर शेती सिंचनाखाली येईल या उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. परंतु धरणात गाळ साचल्याने व मुख्य गेट नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात पाणीसाठा न होता पाणी वाहून जाते. जेमतेम 100 एकर शेतीलाही पाणी मिळत नाही. या धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाल्याचे समजते. मात्र गेटची दुरुस्ती, पिचींग भरणे, गाळ काढणे, पाटचारी तयार करणे, लहान चा:या बनविणे आदी कोणतीही कामे झालेली नाहीत. धरणाच्या दुरुस्तीसाठी मिळालेला निधी व झालेल्या कामांची चौकशी  करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.
सद्यस्थितीत धरणात पाणीसाठा नसल्याने त्याची दुरुस्ती होण्याची गरज आहे. गाळ काढण्यासाठी शासनाने जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन संपूर्ण गाळ काढण्यात यावा. मेनगेट दुरुस्त करून धरणार्पयत जाण्यासाठी रस्ता तयार करावा. या धरणातील गाळ वाहून नेणा:या शेतक:यांकडून काही जण पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर काही महाभाग तर गाळ वाहून नेणा:या वाहनांना आडवे येतात, अशी तक्रार शेतक:यांकडून होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कर्मचा:यांनी तेथे थांबण्याची गरज आहे.
शासनाकडून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहीम राबविली जाते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. त्याचप्रमाणे खापरखेडा धरणातील गाळ उपसण्यासाठी शासनाने जेसीबी मशीन उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे धरणातील गाळही काढला जाईल व शेतक:यांच्या जमिनीसाठी गाळ उपयोगी पडणार आहे. धरणातील गाळ कमी झाल्यानंतर पुरेसा पाणीसाठा होऊन शेती सिंचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाच्या अधिका:यांनी या धरणाच्या दुरुस्तीकडे लक्ष घालून पाण्याअभावी शेती बागायती करण्यापासून वंचित असलेल्या शेतक:यांना पाणी उपलब्ध  करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
 

Web Title: Khaparkheda dam damn useless due to repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.