सातपुडय़ातील मुसळधार पावसामुळे खर्डी नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 05:03 PM2019-06-28T17:03:46+5:302019-06-28T17:03:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा शहरातून वाहणा:या खर्डी नदीला पूर आला़ नदीला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा शहरातून वाहणा:या खर्डी नदीला पूर आला़ नदीला आलेला हा पूर पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांवर नागरिकांनी गर्दी केली होती़ नदी पात्रात यंदा खोलीकरण करण्यात आल्याने परिसरात सिंचन होणार असून पाण्याची चिंता मिटल्याचे शेतकरी आणि नागरिकांच्या चेह:यावर यावेळी झळकत होत़े
दुपारनंतर सातपुडय़ातील चांदसैली घाट परिसरातील दुर्गम भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती़ ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह कोसळणा:या पावसामुळे या भागातील नाले दुथडी भरुन वाहत होत़े हे पाणी खर्डी नदीपात्रात आल्याने नदीला सायंकाळी पूर आला़ पूराचे पाणी शहराकडे येत असल्याचे पाहून नागरिक हरखून गेले होत़े नदीच्या दोन्ही काठासह पुलावर नागरिक गर्दी करुन पाणी पाहत होत़े खर्डी नदीपात्राच्या दुर्दशेवर गेल्या दोन वर्षापासून पालिकेच्या सहकार्याने काही सेवाभावी संस्थांनी मिळून खोलीकरणाचे काम केले आह़े या कामामुळे नदीचे पात्र रुंदावून खोलीही वाढली आह़े परिणामी आसपासच्या शेतक:यांच्या विहिरी व कूपनलिकांचे सिंचन होणार आह़े रात्री उशिरार्पयत नदीच्या पाण्यात वाढ होत असल्याने पालिकेसह पोलीस प्रशासनाने दक्षता घेत नागरिकांना सूचीत केले होत़े