खरीपचे उत्पादन 43 टक्क्यांनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:55 PM2019-01-04T12:55:12+5:302019-01-04T12:55:32+5:30
नंदुरबार : दुष्काळाचा सामना करणा:या जिल्ह्यातील शेतक:यांच्या खरीप पिक उत्पादनात यंदा 43 टक्के घट आली आह़े सलग दुस:या वर्षात ...
नंदुरबार : दुष्काळाचा सामना करणा:या जिल्ह्यातील शेतक:यांच्या खरीप पिक उत्पादनात यंदा 43 टक्के घट आली आह़े सलग दुस:या वर्षात आलेल्या या घटीत दुपटीने वाढ झाल्याने चिंता वाढल्या आहेत़
जिल्ह्यात 2017 या वर्षात सरासरी 715 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ यातून पिक बोंडअळीसारख्या संकटामुळे कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले होत़े हीच स्थिती यंदाही कायम आह़े इतर तेलबिया आणि धान्य पिकांच्या बाबतही हीच स्थिती होती़ यातून जिल्ह्यातील एकूण धान्य आणि गळीत पिकांचे उत्पादन हे 19़9 टक्क्यांनी घटले होत़े हीच गत यंदाही कायम असून पिकांचे उत्पादन 43 टक्क्यांनी घटले होत़े यंदाच्या हंगामात 2 लाख 72 हजार पेरणी क्षेत्रापैकी 2 लाख 43 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्या होत्या़ पेरणी झालेल्या या पिकांना केवळ 37 दिवसच पावसाचा आधार मिळाला होता़ यामुळे पिकांचे उत्पादन हे घटल्याचे कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या पीक कापणी प्रयोगातून समोर आले आह़े पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या या आकडेवारीमुळे जिल्ह्यात आगामी काळात शेतीविकासाबाबत गंभीर निरीक्षणे कृषी विभागाने नोंदवली आहेत़ कृषी विभागाच्या याच अहवालावरुन शासनाकडून दुष्काळ जाहिर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े
चालू रब्बी हंगामाची स्थितीही सध्या बिकट असून आजअखेरीस जिल्ह्यात केवळ 49 टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ यात गहू 10 हजार तर मका 14 हजार हेक्टर्पयतच पेरणी झाला आह़े कापूस उत्पादनाला दोन वर्षापासून घरघर लागली आह़े 17 मध्ये 1 लाख 18 हजार हेक्टर कापूस लागवड होती़ सर्वसाधारण हेक्टरी 2 हजार 12 हेक्टर प्रतिकिलो कापूस उत्पादन जिल्ह्यात घेतले जात़े गेल्या हंगामात केवळ 1 हजार 18 किलोग्रॅम कापूस उत्पादन शेतक:यांच्या हाती आले होत़े दरम्यान या वर्षात 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेल्या कापसाची उत्पादकता ही हेक्टरी 515 किलोग्रॅम एवढी आह़े लागवड क्षेत्राच्या 27 टक्के कापूस उत्पादन शेतक:यांच्या हाती येऊन तब्बल 63 टक्के उत्पादन घटले आह़े
4जिल्ह्यात 2017 च्या खरीप हंगामात 1 हजार 284 हेक्टरी उत्पादन आलेल्या ज्वारीचे यंदा 1 हजार 458 किलो उत्पादन आले आह़े गेल्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन वाढले आह़े जिल्ह्यात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पादन हे 886 किलोग्रॅम एवढे होत़े ज्वारीची उत्पादकता वाढली असली तरी सर्वसाधारण क्षेत्रात 30 टक्के आलेल्या घटीमुळे या उत्पादन वाढीला महत्त्व नसल्याचे दिसून आले आह़े