निरिक्षकांवर जागेवरच कारवाई करणार : खरीप नियोजन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 05:15 PM2018-04-17T17:15:54+5:302018-04-17T17:15:54+5:30
पालकमंत्र्यांचा इशारा, पावणेतीन लाख हेक्टर लक्षांक
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 17 : ज्या भागात बोगस बियाण्यांची विक्री होईल, खतांचा काळाबाजार होईल त्या भागातील कृषी निरिक्षकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईच्या सुचना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलतांना दिल्या. दरम्यान, खरीप उत्पादकता वाढविण्यासाठी शेतक:यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा दोन लाख 73 हजार 588 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगाम आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, आदिवासी प्रकल्प अधिकारी वनमती सी., विनय गौडा यांच्यासह कृषी, वीज, पणन, सहकार, रोहयो यासह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर बोलतांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, पुढील महिन्यापासून बागायती कापूस लागवड होणार आहे. त्यानंतर कोरडवाहू लागवड होईल. त्यामुळे बी.टी.कापूस बियाण्यांना मागणी वाढेल. जिल्ह्यात दरवर्षी बोगस बी.टी.बियाण्यांबाबत मोठय़ा प्रमाणावर तक्रारी येतात. अशी बियाणे कुठून येतात, कोण विक्री करतो याकडे लक्ष देण्यात यावे. ज्या भागात अशी बियाणे विक्री होतील, शेतक:यांची फसवणूक होईल त्या भागातील कृषी निरिक्षकास जबाबदार धरून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे तालुकानिहाय खरीप आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. खरीप कर्जाची प्रकरणे तातडीने मंजुर करून 15 मे र्पयत पीक कर्जाचा सर्व पैसा शेतक:यांच्या हातात पडेल यादृष्टीने नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार डॉ.हिना गावीत यांनी केंद्राच्या विविध योजनेतून जिल्ह्यातील शेतक:यांना लाभ दिला गेला पाहिजे. शेतक:यांर्पयत त्या योजना पोहचल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोंड अळीच्या नुकसानग्रस्त शेतक:यांना किती अनुदान आले, किती वाटप झाले याची माहिती विचारली. याशिवाय बोंडअळीवर नियंत्रणासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या, दुस:या पर्यायी वाणांबाबत जनजागृती करण्यात येत आहे काय? याबाबत विचारणा केली.
आमदार उदेसिंग पाडवी यांनी आदिवासी भागातील शेतक:यांना विशेषत: डोंगर उतारावरील शेती करणा:या शेतक:यांना स्थानिक ठिकाणी मार्गदर्शन करण्याबाबत सुचना केल्या.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, गेल्या काही वर्षात शेतक:यांना अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुका पातळीवर नियोजनावर भर देण्यात आला आहे.
सुरुवातीला प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे यांनी खरीप हंगामाचा आढावा सादर केला.