शहाद्यातून अपहरणाचा प्रयत्न फसला
By admin | Published: January 28, 2017 12:34 AM2017-01-28T00:34:15+5:302017-01-28T00:34:15+5:30
आठ जणांवर गुन्हा : कर्ज प्रकरणातून घडले अपहरणनाटय़
शहादा/ब्राrाणपुरी : सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एकाला आलिशान गाडय़ांमध्ये बसवून पळवून नेत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती़ पोलिसांनी नाकाबंदी करत अपहरणकत्र्याना ताब्यात घेतल्याची घटना शहादा येथे गुरुवारी घडली़ शहादा शहरातील बचपन इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन गोविंद चोथमल अग्रवाल यांना अलिशान वाहनातून पळवून नेत असल्याची माहिती शहादा पोलिसांना गुरुवारी सायंकाळी मिळाली होती़ या माहितीवरून शहादा पोलिसांनी रायखेड पोलीस चौकीत संदेश दिल्यानंतर त्याठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आल़े यात एक अलिशान गाडी पोलिसांच्या ताब्यात आली़ पोलिसांनी चालकाला विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़ मात्र पोलिसी खाक्या दाखवताच, मागील गाडीच्या चालकाला फोन करून रायखेड येथे बोलावल़े त्या वाहनात अपहरण झालेले गोविंद अग्रवाल हे दिसून आल़े पोलिसांनी जप्त केलेल्या दोन्ही गाडय़ा व सात ते आठ जणांना शहादा पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर ताब्यातील संशयित आणि अग्रवाल यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू झाल़े अग्रवाल यांनी शुक्रवारी दोन्ही वाहनातील आठ जणांविरोधात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या आठ जणांना तत्काळ जामीन देण्यात आला आह़े (वार्ताहर)
कर्ज प्रकरणातून घडला प्रकार
अपहरण झालेल्या व्यक्तीची शहादा शहरात खाजगी खाजगी आह़े या व्यक्तीवर कोटय़वधी रुपयांचे कर्ज आह़े या कर्ज प्रकरणातूनच हा प्रकार झाला़ गुरुवारी संबधित व्यक्ती त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी आले होत़े पैसे न मिळाल्याने ते त्यास सोबत घेऊन मध्यप्रदेशाकडे निघाले होत़े मात्र काही काळानंतर पोलिसांना वाहनांच्या क्रमांकासह गाडीत किती लोक आह़े याची माहिती अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली़ पोलिसांनी सर्वाना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर हा प्रकार समजून आला़
फिर्याद देण्यास कुणीही पुढे आले नाही. पोलिसांनी स्वत:हून आठ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तपास करून संबधितांवर कारवाई करण्यात येईल.
-शिवाजी बुधवंत, पो.नि. शहादा.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
शहादा पोलिसांनी संजय विष्णू प्रसाद यादव ,गणेश किसन शिरसाठ, संजय रमेशचंद्र गुप्ता, शेरू बाबूलाल वर्मा, त्रिलोक ओंकार यादव, पवन जगदीश चौधरी, मंगल रमेश बि:हाडे, संतोष सत्यनारायण सिंग सर्व रा़सेंधवा मध्य प्रदेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आह़े या आरोपींकडे असलेल्या महागडय़ा वाहनांना पाहण्यासाठी शहादा पोलीस ठाण्यात आवारात बघ्यांची गर्दी झाली होती़
4अग्रवाल यांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले होत़े शुक्रवारी अग्रवाल यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी लतीफ तडवी यांच्यासोबत चर्चा केली होती़