कुंडलेश्वर अजुनही विकासाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:39 PM2020-01-22T12:39:02+5:302020-01-22T12:39:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : पर्यटनस्थळ व दोन राज्यातील भाविकांचे श्रद्धेचे कुंडलेश्वर हे निसर्गरम्य देवस्थान ईच्छागव्हाण ता. तळोदा ग्रुपग्रामपंचायत ...

Kundleshwar still waiting for development | कुंडलेश्वर अजुनही विकासाच्या प्रतिक्षेत

कुंडलेश्वर अजुनही विकासाच्या प्रतिक्षेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सोमावल : पर्यटनस्थळ व दोन राज्यातील भाविकांचे श्रद्धेचे कुंडलेश्वर हे निसर्गरम्य देवस्थान ईच्छागव्हाण ता. तळोदा ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येते. या ठिंकाणी नेहमीच भाविकांची गर्दी होत असते. परंतु या ठिकाणाच्या विकासाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे ठिकाण अद्याप विकासाच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुंडलेश्वर येथे नियोजित करण्यात आलेल्या योजना अपूर्ण असल्याने या स्थळाचा विकास होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मूलभूत सोयी-सुविधा अभावी पर्यटकही याकळे पाठ फिरवीत असल्याचे सांगण्यात येत आहे. कुंडलेश्वर हे तालुक्यातून जाणाऱ्या बºहाणपूर - अंकलेश्वर महामार्गाच्या उत्तरेस सातपुड्याच्या पायथ्याशी अक्कलकुवा तालुक्याच्या सीमेला लागून आहे. मोक्याचे ठिकाण असल्याने पर्यटकांची बºयापैकी गर्दी येथे असते.
या ठिकाणी जाण्यासाठी महामार्गावरील शिर्वे गावावरून रस्त्याने जाता येते. येथे प्राचीन महादेव मंदिर, बारमाही वाहणारा गरम पाण्याचा झरा तसेच चोहोबाजुने वेढलेल्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या वृक्ष, वेली आहे. त्यामुळे येथे पर्यटक तसेच भाविकांचा ओढा मोठया संख्यने असतो. या ठिकाणी असलेले प्राचीन महादेव मंदिर व बारमाही गरम पाण्याचा झरा भविक व पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. त्यामुळे येथे जिल्ह्यासह शेजारील गुजरात व मद्यप्रदेशातील भाविक व पर्यटक शेकडोच्या संख्यने मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान व पूजा करण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे व्यवसायिक देखील येथे हजेरी लावीत असतात. दरवर्षी गदीर्चे प्रमाण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर येथे करण्यात आलेल्या सोयी - सुविधा नावालाच असल्याचे या ठिकाणी जाणाºया पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकामही अपूर्ण असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. दरम्यान स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी टाकीचे बांधकाम देखील अपूर्ण आहे.पर्यटकांना पाण्यासाठी इतरत्र शोधाशोध करण्यात येत आहे. त्यामुळे येथे पर्यटन विभागाने अधिक लक्ष दिल्यास, आहे त्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हे पर्यटनस्थळ भविष्यात समोर येऊ शकते, अशी अपेक्षा पर्यटकांकडुन करण्यात येत आहे.

कुंडवा येथे प्राचीन महादेव मंदिर असलेल्या एका ठिकाणी संरक्षक कठड्याचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या कठड्यालाच संरक्षणाची गरज भासत आहे. हा कठडा जीर्ण झाला असल्याने त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या कठड्याचा आधार घेऊनच पर्यटक तथा भाविक मार्गक्रमण करीत असून हे कठडे भाविकांना धोकादायक ठरत आहे. यातून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याठिकाणी वर्षभर भाविक तसेच पर्यटक भेट देत असतात. परंतु पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याने येथे काही अंशी नाराजीचा सूर उमटू लागला आहे. येथे येण्यासाठी असलेल्या रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. वाहन चालविण्यासाठी ही वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.या परिसरात जाण्यासाठी असलेला सुमारे दोन किमीचा रस्ता अत्यंत खराब असून जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे येथे प्राथमिक सुविधा तरी प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Kundleshwar still waiting for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.