लेबर बजेट आराखडा ठरवेल गाव विकासाची दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:46+5:302021-07-16T04:21:46+5:30
या माध्यमातून गावे समृद्ध करून अकुशल कामे मागणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होईल. या उद्देशाने येणाऱ्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ...
या माध्यमातून गावे समृद्ध करून अकुशल कामे मागणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होईल. या उद्देशाने येणाऱ्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियोजन करण्यात येणार आहे. नियोजनाचा केंद्रबिंदू ग्रामपंचायत असल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील गावे कशी समृद्ध होतील व त्या गावांतील लोक श्रीमंतीच्या मार्गावर कसे जातील, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतीचा लेबर बजेट व कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक उन्नती आणण्याच्या दृष्टीने गावात ज्या कामांची गरज आहे त्यांचे चिन्हांकन करून अकुशल कामांच्या भरवशावर जगणाऱ्या कुटुंबांना त्या कामांमध्ये अशा पद्धतीने सहभागी करून घेण्यात येणार आहे. ज्यामुळे भविष्यात ते कुटुंब स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारून अकुशल कामाची मागणीच करणार नाहीत, असा या लेबर बजेट व कृती आराखड्याचा उद्देश असल्याची माहिती देण्यात आली.
यासंदर्भात लवकरच जिल्हास्तरावर एक कार्यशाळा आयोजित करून समृद्धी लेबर बजेट, तसेच कृती आराखड्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.