ग्रामीण भागातील प्रयोगशाळेमुळे मदत होईल- ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर
By admin | Published: June 22, 2017 04:32 PM2017-06-22T16:32:17+5:302017-06-22T16:32:17+5:30
आगामी काळात अनेक प्रयोगशाळा पुढे येऊ शकतात़ त्यामुळे शेतक:यांना विविध पर्याय उपलब्ध होऊन, तंत्रज्ञान समजण्यास मदत होऊ शकेल, असे प्रतिपादन डॉ़ अनिल काकोडकर यांनी केल़े
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.22 : ग्रामीण भागातील रोपनिर्मिती प्रयोगशाळा लहान असली तरी, आगामी काळात एक नव्हे तर अनेक प्रयोगशाळा पुढे येऊ शकतात़ त्यामुळे शेतक:यांना विविध पर्याय उपलब्ध होऊन, तंत्रज्ञान समजण्यास मदत होऊ शकेल, असे प्रतिपादन परमाणू ऊर्जा आयोगाचे सदस्य व राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ़ अनिल काकोडकर यांनी केल़े
केंद्रशासन अणुऊर्जा विभाग सामाजिक उपक्रमानुसार आकृती टेक कार्यक्रमांतर्गत केळी उतीसंवर्धित रोपनिर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ कार्यक्रम डॉ़ काकोडकर यांच्या हस्ते करणखेडा ता़ नंदुरबार येथे झाला, यावेळी ते बोलत होत़े कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, राज्य विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य डॉ़ गजानन डांगे, कृषी शास्त्रज्ञ विश्वास कुळकर्णी, स्मिता मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे, आत्माचे प्रकल्प संचालक मधुकर पन्हाळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उमाकांत पाटील, हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे उपस्थित होत़े
डॉ़ काकोडकर म्हणाले की, तंत्रज्ञानाविषयी जाणीव भोवतालच्या परिसरात वाढवण्यासाठी अशा प्रयोगशाळांचा उपयोग होऊ शकतो़ कुठलेही तंत्रज्ञान प्रयोगशाळेत विकसित झाल्यानंतर शेवटच्या घटकार्पयत पोहोचवण्यासाठी अनेक बाबी पार पाडाव्या लागतात़ यासाठी एक मध्यस्थी संस्था असणे आवश्यक असून या भागात काम करणा:या स्वयंसेवी संस्थांनी मध्यस्थाची भूमिका बजवावी जेणेकरून शेतक:यांना तंत्रज्ञान समजण्यास मदत होऊन, त्यांचा फायदा होईल़