पुणे जिल्ह्यात अडकून पडलेले मजूर परतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 05:31 PM2019-01-05T17:31:53+5:302019-01-05T17:31:59+5:30

शहादा : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार म्हणून पुणे जिल्ह्यात गेलेल्या सिंधी दिगर ता़ धडगाव येथील 20 मजूरांना टोळीतील ...

Laborers stranded in Pune district | पुणे जिल्ह्यात अडकून पडलेले मजूर परतीला

पुणे जिल्ह्यात अडकून पडलेले मजूर परतीला

googlenewsNext

शहादा : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार म्हणून पुणे जिल्ह्यात गेलेल्या सिंधी दिगर ता़ धडगाव येथील 20 मजूरांना टोळीतील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर परतीचा प्रवास करावा लागला़ वेठबिगाराची वागणूक मिळालेल्या या मजूरांना कामाचा मोबदला न देताच कारखान्याने परत पाठवले असून मुकादमाकडे पैसे दिल्याचे सांगून  अंग काढून घेतले आहेत़ 
तोरणमाळ येथून 12 किलोमीटर अंतरावरील सिंधीदिगर ता़धडगाव येथून 20 मजुर 15 दिवसांपूर्वीच छापडापाडा येथील रायसिंग पावरा या मुकादमामार्फत शिरसोडी ता़ इंदापुर, जि़ पुणे येथील दौंड साखर कारखान्यात ऊसतोड कामगार म्हणून गेले होत़े यातील पिनाबाई घनश्याम पावरा (25) यांचे किरकोळ आजारामुळे 2 जानेवारी रोजी निधन झाल़े  याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर तेथील रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन करुन मृतदेह संबधितांना सोपवण्यात आला होता़ यावेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी जाण्याची इच्छा सर्वानीच व्यक्त केल्यानंतर संबधित कारखाना प्रशासनाने अटकाव करुन रुग्णवाहिका करुन देत गुला दुरसिंग पावरा, घनश्याम सुमा पावरा, किताबसिंग गुला पावरा यांनाच मृतदेहासोबत सिंधीदिगर येथे परतण्याची परवानागी दिली होती़ त्यानुसार 2 रोजी रात्री 9 वाजता ही रुग्णवाहिका नंदुरबार जिल्ह्याच्या दिशेने निघाली होती़ 3 जानेवारी रोजी सायंकाळी शहादा येथे पोहोचल्यानंतर मात्र लोणखेडा बायपासवर चालकाने पुढे जाण्यास असमर्थता दर्शवली होती़ रुग्णवाहिकेतील तिघांनी ही माहिती तोरणमाळचे माजी सरपंच सिताराम पावरा यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ लोणखेडा बायपासवर भेट दिली होती़ यावेळी त्यांच्यासोबत महाविर पतसंस्थेचे संचालक समीर जैन , मंदाण्याचे उपसरपंच अनिल भामरे आदी होत़े त्यांनी रुग्णवाहीका चालक बाळू लोंढे याच्यासोबत चर्चा केली़ दरम्यान लोंढे यांनी थकवा आल्याने गाडी चालवू शकत नसल्याचे सांगितल्यानंतर दुस:या रुग्णवाहिकेची सोय करुन त्याला परत पाठवण्यात आल़े प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक उपनिरिक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस कॉन्स्टेबल संजय ठाकुर हेही उपस्थित होत़ेदरम्यान कारखाना प्रशासनाने सर्व मजूरांना स्वतंत्र वाहन करुन देत परत पाठवून दिले आह़े परंतू त्यांचे पैसे मुकादम रायसिंग पावरा याच्याकडे दिले असल्याने मजूर आणि कारखान्याचा काहीएक संबध नाही असे कळवून या प्रकारणातून अंक काढून घेतले आह़े 15 दिवसांपूर्वी मजूरांना घेऊन जाणारा रायसिंग हाही गायब असून वेठबिगारासारखी अपमानास्पद वागणूक सहन करणा:या मजूरांच्या माथी पुन्हा वणवण आली आह़े 
तोरणमाळचे माजी सरपंच सिताराम पावरा यांनी कारखाना प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याची माहिती आह़े मजूरांना डांबून ठेवल्याची माहिती समोर आल्यानंतर सेवाभावी नागरिकांसह पोलीस प्रशासनाकडूनही साखर कारखान्याकडे संपर्क करण्यात आला होता़ यातून सर्व मजूरांना परत पाठवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े हे मजूर शनिवारी सकाळी शहादा येथे पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: Laborers stranded in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.