भाविकांचे सुविधांअभावी हाल : कोचरा माता मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 05:35 PM2018-08-01T17:35:26+5:302018-08-01T17:35:38+5:30
चिखलातून काढावा लागतो मार्ग, सर्वत्र घाणीचे साम्राज्य
मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शहादा तालुक्यातील कोचरा येथील कोचरा माता मंदिरावर येणा:या भाविकांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. याठिकाणी नवस फेडण्यासाठी येणा:या भाविकांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शहादा तालुक्यातील कोचरा येथे कोचरा मातेचे पुरातन मंदिर आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून श्रद्धा असल्याने येथे भाविकांची मोठय़ा प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होते. मंगळवार व शुक्रवारी मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील भाविक नवस फेडण्यासाठी येतात. मात्र येथे मंदिराकडे जाणा:या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने मंदिरार्पयत कसेबसे पोहोचावे लागते. नवस फेडण्यासाठी येणा:या भाविकांना उघडय़ावरच स्वयंपक करावा लागतो. त्यासाघी येथे स्वतंत्र शेड जर उभारले तर भाविकांची सोय होणार आहे. पाण्याच्या व्यवस्थेसाठी येथे दोन हातपंप व पाण्याची टाकी आहे. परंतु पाण्याची टाकी नादुरुस्त असल्याने व एक हातपंप बंद असल्याने एकाच हातपंपावर भाविकांची गर्दी होते. त्याठिकाणी पाण्याच्या निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने घाणीचे प्रचंड साम्राज्य असते. जेवणानंतर तेथेच कागदी ग्लास व इतर साहित्य टाकले जात असल्याने अस्वच्छता होते. स्वयंपाक झाल्यानंतर याठिकाणी भांडी व कपडे धुतात. परंतु येथे नंतर साफसफाई होत नाही. याठिकाणी पाण्याच्या निचरा होण्यासाठी गटारी बांधण्याची गरज आहे. काही भाविकांकडून होणारी घाण रोखण्यासाठी मंदिराच्या पदाधिका:यांनी लक्ष देऊन स्वतंत्र व्यक्ती नेमण्याची गरज आहे. या घाणीमुळे मंदिर परिसरात अक्षरश: दरुगधी पसरते. म्हणून भाविकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
मंदिर परिसरात काही अंतरावर होळकरकालीन प्राचीन विहीर आहे. या विहिरीच्या परिसरातही घाण असून दुरवस्था झाली आहे. कोचरा माता मंदिरासमोर नाला असून तो सद्यस्थितीत बंद असला तरी त्यात साचलेल्या घाणीमुळे दुर्गधी पसरते. मंदिरासमोर माऊल्या असून नारळ फोडण्यासाठी तेथेच व्यवस्था असल्याने तेथेही नेहमी घाण असते.
मंदिर परिसरात रस्त्याची दुर्दशा
कोचरा माता मंदिरावर बाराही महिने भाविकांची गर्दी होते. मंदिराकडे जाणा:या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळा सुरू आहे. या रस्त्यावर नेहमी चिखल असल्याने पायी येणा:या भाविकांना चालणेही मुश्कीलीचे होते. त्यामुळे या रस्त्याचे त्वरित नूतनीकरण करण्याची गरज आहे.