धडगांव परिसरात नेटवर्कचा अभावाने विद्यार्थ्यांना फटका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:26 AM2021-01-14T04:26:40+5:302021-01-14T04:26:40+5:30

धडगाव हा अतिदुर्गम भागातील तालुका आहे.तसेच विविध खेड्यापाड्यातून 25 ते 30 किलोमीटर लांबून नागरिक आपली प्रशासकीय कामे व बँकिंग ...

Lack of network in Dhadgaon area hits students. | धडगांव परिसरात नेटवर्कचा अभावाने विद्यार्थ्यांना फटका.

धडगांव परिसरात नेटवर्कचा अभावाने विद्यार्थ्यांना फटका.

Next

धडगाव हा अतिदुर्गम भागातील तालुका आहे.तसेच विविध खेड्यापाड्यातून 25 ते 30 किलोमीटर लांबून नागरिक आपली प्रशासकीय कामे व बँकिंग ची कामे करण्यासाठी धडगाव शहरात दाखल होतात.परन्तु तालुक्यातील बहुतांशी प्रशासकीय ऑनलाइन सुविधा व बँकिंगची कामे ही बी.एस.ऐन.एल नेटवर्क वर अवलंबून असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतांना दिसत आहेत.

धडगाव तालुक्यातील बी.एस.ऐन.एल सुविधा बाबतीत तालुक्यातील सामाजिक संघटनांनी अनेकदा निवेदनाद्वारे तक्रार व सामाजिक कार्यकर्त्याद्वारे उपोषण देखिल करण्यात आलं परन्तु तक्रारीची कोणतीही दखल न घेता विचारलेल्या जबाबाची खोटी आश्वासने बी.एस.ऐन.एल प्रशासनाकडून दिली जात आहेत अशी तक्रार परिसरातील नागरिक करता आहे.

"अक्राणी तालुक्यातील बी.एस.ऐन.एल सुविधांचा अभाव नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत आहे.उपोषण करून व निवेदन देऊनही अक्राणी तालुक्यातील बी.एस.ऐन.एल सुविधा सुरळीत होतांना दिसत नसून लवकरच ही सुविधा सुरळीत केली नाही तर तालुक्यातील कार्यालयाला कायमस्वरूपी कुलूप लावून बी.एस.ऐन.एल सिमकार्ड विक्री थांबवत घेतलेली सिमकार्ड परत करण्यास सुरूवात करू."

जितेंद्र दिलीप ढोले

(अक्राणी तालुका समन्वयक-महाराष्ट्र राज्य युवा परिषद) यांनी केलं आहे

बसस्थानकांत जनसंपर्काचे म्हत्वपुर्ण जबाबदारीचे काम करणारा वाहतुक निंयत्रक कर्मचारी चौकशी कक्षात बसून प्रवाशांना बस फेऱ्याचे वेळापत्रक नूसार येणाऱ्या बसचे व जाणाऱ्या बसचे नियोजन सांगण्याचे काम करत असतो. वाहतुक निंयत्रक प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याचे काम करत असतात. इतर जिल्ह्यातुन व राज्यातुन येणाऱ्याा बसेस ची माहीती प्रवाशांना देत असतात.चौकशी कक्षात काम करताना दररोज हजांरो प्रवाशांसोबत संबध येत असल्याने वेळ कुठल्या कुठे निघून जाते समजत नाही. दररोज अधिक प्रवाशांसोबत संबध येत असल्याने वेगवेेगळ्या स्वभावाचे प्रवाशी भेटत असतात,त्यामुळे काही गोष्टी शिकायला मिळतात.

प्रवाशी आमचे दैवत या बस महामंडळाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या शंका निरसन वाहतुक नियंत्रक करत असल्याने अनेक प्रश्नाना उत्तरे देत असतात. मात्र काही प्रवाशांना दिलेली माहीती समजून येत नाही, बस काही वेळापुर्वी गेलेली असते किंवा काही कारणास्तव बसला उशीर होत असतो त्यामुळे प्रवाशी कर्मचाऱ्यासोबत वाद घालत असतात. अशावेळी तोंडात साखर व डोक्यावर बर्फ घेऊन त्यांच्या समस्याचे सोडवण्यासाठी काम करावे लागते. काही प्रवाशांची समस्या सोडवण्यासाठी बस स्थांनकांतील वरीष्ठ अधिकांऱ्याना पाचारण करून मदत केली जाते.

प्रवाशांना माहीती देताना किमान आठ तास सलग बोलावे लागत असल्याने काही प्रमाणात थकवा जाणवत असतो. वाद घालणाऱ्या प्रवाशांमुळे मनस्ताप होत असतो,त्यामुळे काम करताना मानसिक शांतता नसल्याने माहिती देताना परिणाम जाणवतो. दिवसभर काम करून घरी गेल्यावर काही वेळ निवांत बसल्याने दिवसभराचा मनस्ताप नाहीसा होतो,त्यानंतर कुटूंबासोबत गप्पा मारत वेळ घालवत असतो, त्यामुळे दिवसभर जनसंपर्काचे काम करून कोणतेही नुकसान होत नाही.

आम्ही कर्मचारी दिवसभर काम करताना प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा करतो, प्रवाशांनी माहिती विचारण्याआधी बसचे वेळापत्रक वाचून घ्यावे, माहिती विचारताना संयमाने बाेलावे, प्रवाशांना माहिती देतांना फोन घेतला जात नाही तरी प्रतिक्षा करणे आवश्यक असते,सांगितलेली माहिती काळजीपुर्वक ऐकावे,माहिती समजली नसेल तर परत विचारावे,बसला काही कारणासत्व उशीर झाला तर सहकार्याची भावना ठेवली पाहीजे. प्रवाशांनी सहकार्याची भावना ठेवली तर समस्या लवकर सोडवता येते.

- मुरलीधर बहिरम,वाहतुक नियंत्रक,बसस्थानक नंदुरबार

Web Title: Lack of network in Dhadgaon area hits students.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.