नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:49 AM2017-11-22T11:49:16+5:302017-11-22T11:49:34+5:30
कापूस वेचणीवर परिणाम : पेरणी केलेल्या बियाण्याचे नुकसान
Next
ल कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात मंगळवारी सायंकाळी मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग जलमय झाला होता़ शेतशिवारात कापूस वेचणीचे काम सुरू असतानाच पाऊस आल्याने कापूस ओला होऊन नुकसान झाले आह़े पावसामुळे पेरणी केलेले गहू व हरभ:याचे बियाणे वाहून जाण्याची भिती आह़े नंदुरबार तालुक्यातील न्याहली, भादवड, बलदाणे, आक्राळे, घोटाणे, रनाळे, रजाळे, बलवंड यासह विविध भागात दुपारी साडेचार ते पाच वाजेदरम्यान मुसळधार अवकाळी पाऊस झाला़ अर्धातास झालेल्या पावसामुळे शेतशिवारात मजूरांची धावपळ उडाली होती़ शेतशिवारासह खळवाडय़ांमध्ये सुकवण्यासाठी ठेवलेल्या ज्वारी आणि बाजरीसह इतर उत्पादन आवरण्यासाठी शेतक:यांची धावपळ झाली़ यावेळी जोरदार वारे वाहत असल्याने धान्य व कापसावर टाकलेले आच्छादन उडाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत होत़े ठिकठिकाणी शेत शिवारात पाणी साचून असल्याने पेरलेले बियाणे खराब होण्याची चिन्हे आहेत़ शहादा तालुक्यातील कळंबू, सारंगखेडा, वडाळी या परिसरातील गावांमध्ये मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता़ हा अंदाज सायंकाळी साडेपाच वाजेच्यासुमारास खरा ठरून सारंगखेडा व परिसरात वादळीवा:यासह पाऊस झाला़ शहादा तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्याची माहिती देण्यात येत आह़े