नंदुरबार जिल्ह्यातील सव्वा लाख शेतक:यांच्या हाती ‘मृद आरोग्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:22 PM2017-12-05T12:22:35+5:302017-12-05T12:22:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 2015 ते डिसेंबर 2017 र्पयतच्या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतक:यांना राष्ट्रीय शाश्वत शेती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 2015 ते डिसेंबर 2017 र्पयतच्या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतक:यांना राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आल आह़े पुढील वर्षात अजून 50 हजारांहून अधिक शेतक:यांना मृद आरोग्य पत्रिका वाटपाचे उद्दिष्टे आह़े
2015-2016 मध्ये एकूण 17 हजार 747 मृद नमुने तपासून 73 हजार मृद पत्रिकांचे वाटप करण्यात आले होत़े त्याच प्रमाणे 2016-2017 मध्ये 23 हजार 688 नमुने तपासून 45 हजार पत्रिकांचे वाटप झाले तर डिसेंबर 2017 र्पयत 12 हजार 815 मृदेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येवून 7 हजार मृद पत्रिकांचे वाटप करण्यात आले आह़े
आपल्या मृदचे आरोग्य कसे आहे, त्यात कुठल्या पोषक घटकाची कमतरता आहे, तसेच कुठल्या घटकाचे प्रमाण अधिक आहे, हे जाणून घेत त्या दृष्टीने खताची मात्रा वापरणे महत्त्वाचे असत़े त्यामुळे यासाठी केंद्र शासनाकडून मृद आरोग्य पत्रिका योजना सुरू करण्यात आली होती़ यानुसार प्रयोगशाळेमार्फत शेतक:यांच्या मृदची तपासणी करण्यात येऊन त्यात कुठल्या घटकाचे कमी-जास्त प्रमाण आहे, याचे सव्रेक्षण करण्यात येत असत़े व त्यानुसार त्यांना आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येत असत़े
शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी मृद सर्वेक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागात शेतक:यांमध्ये मोठय़ा प्रमाणात निरक्षरता आह़े यामुळे आपल्या जमिनीत कुठल्या पोषक घटकांची कमतरता आहे, याची जाण त्यांना नसत़े
खतांच्या मात्रा माहीत नसल्याने साहजिकच याचा परिणाम पीक वाढीवर होत असतो़ प्रयोगशाळांकडून मृदचा एनपीके म्हणजेच नायट्रोजन, पोटॅशिअम, फॉस्फरस तसेच जमिनीचा कस तपासण्यात येत असतो़ व त्यानुसार शेतक:यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येत असत़े शेतक:यांनी खतांची खरेदी करण्यासाठी जाताना ती आरोग्य पत्रिका सोबत नेत त्यानुसार खतांची खरेदी करणे अपेक्षित असत़े
दरम्यान, मृदची तपासणी करण्यासाठी शासणाकडून श्री कृषी लॅबोरेटरीज मालेगाव, साने गुरुजी शिक्षण मंडळाचे कृषी महाविद्यालय शहादा तसेच शासकीय जिल्हा सव्रेक्षण प्रयोगशाळ धुळे यांच्यातर्फे जिल्ह्यातील मृद सव्रेक्षण करण्यात येत असत़े शासनाकडून यासाठी मृदच्या एका नमुन्यासाठी 168 रुपये मोजण्यात येत असतात़
निधीचा पूर्ण उपयोग.
केंद्र व राज्य शासनाकडून या योजनेसाठी निधीची तरतुद करण्यात येत असत़े सण 2017 साठी केंद्र शासनाकडून 28 लाख 69 हजार तर राज्य शासनाकडून 23 लाख 60 हजारांचा असा एकूण 52 लाख 29 हजारांच्या निधीची तरतुद करण्यात आली होती़ यापैकी, 51 हजार 83 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आह़े त्यासोबतच मिनी लॅबसाठीही केंद्र शासनाकडून 11 लाख 61 हजार तर राज्या शासनाकडून 7 लाख 74 हजार असा एकूण 19 लाख 35 हजार रुपयांच्या निधी देण्यात आला आह़े तोही निधी कृषी विभागाकडून खर्च करण्यात आला आह़े
2017-2018 साठीही पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला आह़े केंद्रशासनाकडून 5 लाख 20 हजार तर राज्य शासनाकडून 3 लाख 47 हजार असा एकूण 8 लाख 67 हजार रुपयांचा निधी मिळाला आह़े पैकी आतार्पयत 7 लाख 81 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आह़े अजून पुढील काही टप्प्यात निधी येणे अपेक्षीत आह़े