पाण्याअभावी पपई पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:53 AM2018-10-26T11:53:58+5:302018-10-26T11:54:03+5:30

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता ...

Large losses of papaya crops due to lack of water | पाण्याअभावी पपई पिकांचे मोठे नुकसान

पाण्याअभावी पपई पिकांचे मोठे नुकसान

Next

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े परिसरातील पाणी पातळी खोल गेली असल्याने साहजिकच पिण्याच्या पाण्याचाही मोठा तुटवडा आह़े
नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, खोडसगाव, शिंदे, समशेरपूर, खोंडामळी, विखरण, बामडोद, भागसरी, कोळदे, पळाशी, पातोंडा, पथराई, सिंदगव्हाण, भालेर आदीसह परिसरात पपईचे पिक मोठय़ा प्रमाणात घेण्यात आलेले आह़े परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने या ठिकाणची पपईसह सोयाबीन, केळी, कापूस आदी पिकांची वाढ खुंटली आह़े 
पाण्याअभावी परिसराची स्थिती अत्यंत विदारक झालेली आह़े या ठिकाणच्या विहिरी तसेच कुपनलिकांनाही पाणी नसल्याने पिकांसाठी पाणी आणावे कुठून असा प्रश्न शेतक:यांसमोर निर्माण झाला आह़े पाणी नसल्याने बहुतेक शेतक:यांनी आपली शेते रिकामी केली आहेत़ याचेच एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे खोडसगाव येथील सुरेश पाटील यांनी आपल्या 5 एकरावरील पपईवर रोटोव्हेटर फिरवून पिक नष्ट केले आह़े तसेच विलास पाटील, मोहन पाटील यांनीदेखील अनुक्रमे पपई व मिरचीच्या पिकावर रोटोव्हेटर फिरवले आह़े पाण्याची पातळी खोल गेलेली आह़े त्यातच सूर्य आग ओकत आह़े त्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत दैनिय झालेली आह़े पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटली आह़े केळी, पपई, मिरची आदी पिक करपायला सुरुवात झालेली आह़े 
पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आह़े काही ठिकाणी पपईचे झाड आकुंचन पावत आह़े पावसाअभावी कापूस, पपई, मिरची आदीचा उत्पादन खर्च काढणेही शेतक:यांना कठीण होऊन बसले आह़े त्यामुळे साहजिकच यातून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े 
विहिरींचे खोलीकरण
नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आह़े त्यातून पाण्याचा उपसा केला जात आह़े दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे यंदा मोठय़ा प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आलेली होती़ परंतु पावसाने पाठ फिरवल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला नाही़ शिवाय धरणे, लघुप्रकल्प तसेच इतर जलस्त्रोतही भरले नसल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढली आह़े 
जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतका पाऊस झाला आह़े परतीच्या पावसानेही घोर निराशा केली आह़े त्यामुळे पुढील उन्हाळ्यार्पयत पाण्याची सोय होणे महत्वाचे आह़े पुढील पाऊस लांबला तर भिषण दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आह़े 
 

Web Title: Large losses of papaya crops due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.