नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेला मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:47 PM2018-05-05T12:47:47+5:302018-05-05T12:47:47+5:30

अर्चना पठारे : वेळेवर मजुरी देण्याचे प्रमाण 50 वरून 89 टक्के, अपुर्ण कामे पुर्ण

Large scale employment guarantee scheme in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेला मोठा वाव

नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेला मोठा वाव

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांची उद्दीष्टपुर्ती झाल्याने जिल्हा राज्यात 16 व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रय} सुरू आहेत. मजुरांना वेळेवर मजुरी देण्याबाबत आपण कटाक्षाने लक्ष घातले असून त्याचा परिणाम योजनेच्या विश्वासहार्तेवर होत आहे. शिवाय अपुर्ण कामांबाबत जिल्हा राज्यात सर्वात मागे होता तो दहा महिन्यात वरच्या स्थानावर आला आहे. त्याचे समाधान असून आता रेशीम उत्पादनाचे प्रयोग योजनेच्या माध्यमातून राबविण्याचा मानस असल्याची माहिती रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी ‘लोकमत’ संवाद उपक्रमात बोलतांना दिली.
उपजिल्हाधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील, मनोज शेलार उपस्थित होते. डॉ.अर्चना पठारे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांची सद्य स्थिती, या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम व कामे, मजुरांचे स्थलांतर यासह विविध बाबींची माहिती दिली. त्यांनी सांगितले, जिल्ह्यात रोजगार हमी योजनेला मोठा वाव आहे. दुर्गम भागात अर्थात धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर या तालुक्यांमधून कामांची मोठी मागणी असते. या योजनेअंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याची प्रयोजन असते. त्यामुळे मजुरांनी साध्या कागदावर दोन ओळीत जरी कामाची मागणी केली तरी  त्यांना पाच किलोमिटरच्या आत उपलब्ध करून द्यावी लागत असते. तोच प्रय} सध्या सुरू आहे.
अपुर्ण कामे पुर्ण करण्यावर भर
जिल्ह्यात रोहयोअंतर्गत 2011-12 या वर्षापासूनची जवळपास 26 हजार कामे अपुर्ण होती. अपुर्ण कामांमध्ये जिल्ह्याचा क्रमांक राज्यात शेवटून चौथ्या क्रमांकावर होता. आपण पदभार स्विकारल्यानंतर जिल्हाधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली अपुर्ण कामे पुर्ण करण्यावर भर देत आहोत. त्यामुळे अपुर्ण कामे पुर्ण करण्याचा टक्केवारीत जिल्हा आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. 
मजुरांना वेळेवर मजुरी
जिल्ह्यातील रोहयोच्या कामांवरील मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याची ओरड होती. त्यामुळे अनेक मजुर कामापासून दुरावले होते. त्याचा परिणाम स्थलांतरावर दिसून आला. आपण पदभार घेतल्यानंतर या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष घातले. सातत्याने कामांवरील भेटी व पाठपुराव्यामुळे त्यातही सुधारणा झाली आहे. यापुर्वी मजुरांना मजुरी देण्याच्या बाबतीत जिल्हा 16 व्या क्रमांकावर होता तो आता चौथ्या स्थानावर आहे. हे पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रय} राहणार आहे. 
स्थलांतरीतांची आकडेवारी
जिल्ह्यात दिवाळी ते उन्हाळा या चार ते पाच महिन्यात मोठय़ा प्रमाणावर मजुरांचे स्थलांतर होते. स्थलांतरीतांची आकडेवारी मात्र कुठेही उपलब्ध राहत नाही. ती उपलब्ध करण्यासाठी प्रय} सुरू आहेत. स्थानिक ठिकाणीच काम आणि वेळेवर मजुरीची रक्कम मिळाल्यास मजुरांचे स्थलांतर होणार नाही. त्यावर आपला भर राहणार असल्याचे डॉ.अर्चना पठारे यांनी सांगितले.
रेशीम लागवड व फळबाग
जिल्ह्यात फळबाग लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. गेल्या काही वर्षात फळबागचे क्षेत्र वाढले आहे. त्याअंतर्गत मजगीची कामे घेण्यावर भर देण्यात आला आहे. फळबाग आणि मजगीच्या कामांचे नवापूर तालुक्यात एक, दोन ठिकाणी चांगले प्रयोग झाले आहेत. 
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रेशीम लागवडीवर देखील भर दिला जाणार आहे. नाशिक येथील रेशीम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ही योजना कशी राबविता येईल याबाबत चर्चा करण्यात आली आहे. 
महिना 70 ते 80 हजार रुपये उत्पन्न या माध्यमातून मिळू शकेल. त्यामुळे जिल्ह्यात या उद्योगाला चांगला वाव राहणार आहे. त्यादृष्टीने आपला प्रय} सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
पाणंदचे 200 रस्ते होणार
पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात 200 रस्त्यांचे टार्गेट आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. ग्रामसभेने ठराव दिल्यावर प्राधान्य क्रम ठेवून रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यात प्रोबेशनरी प्रांताधिकारीपदाचे कामकाज पाहिल्यानंतर नंदुरबार येथे रोहयो उपजिल्हाधिकारी पदाची पहिलीच नियमित नियुक्ती मिळाली आहे. थेट नागपूर जिल्ह्यातून नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी आपण स्वत:हून मागून घेतली आहे. आदिवासी भागात काहीतरी चांगले करता येईल याबाबत आपण सुरुवातीपासूनच मनात निर्धार केला होता. या भागात येण्यापूर्वी जे ऐकले होते त्यापेक्षा बरीच तफावत व वेगळी स्थिती येथे दिसून आली. येथे काम करण्यास वाव आहे, शिवाय अधिकारी व लोकांचेही खूप सहकार्य मिळते. त्यामुळे काम करण्याचा आनंद वेगळाच आहे.  जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांचे मार्गदर्शन व सहकारी अधिका:यांचे सहकार्य नेहमीच मिळत असते. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 20 लाख 11 हजार प्रतीमजूर प्रतीदिन रोजगार उपलब्ध झाला. जवळपास 60 कोटी रुपये त्यावर खर्च झाला आहे. दोन लाख 90 हजार जणांना जॉबकार्ड दिली गेली आहेत. सद्य स्थितीत एक लाख 74 हजार काम करणारे मजुर आहेत. 2017-18 मध्ये 14 हजार कामे पुर्ण केली असल्याचेही डॉ.अर्चना पठारे यांनी सांगितले. 

Web Title: Large scale employment guarantee scheme in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.