गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रणासाठी भरारी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:59 PM2019-08-09T12:59:01+5:302019-08-09T12:59:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील गौण खनिजाची होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन, महसूल आणि पोलिस विभागांनी भरारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील गौण खनिजाची होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन, महसूल आणि पोलिस विभागांनी भरारी पथक नेमावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा गौण खनिज दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधिक्षक सीताराम गायकवाड आदी उपस्थित होते. डॉ.भारूड म्हणाले, गावातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने गावातील रस्ते खराब होतात. गौण खनिजाची वैध पद्धतीने रॉयल्टी मिळाल्यास रस्ते विकासाची कामे करता येतात. त्यामुळे अवैध वाहतूक रोखण्यासाठी ग्रामस्तरावरदेखील समित्यांची स्थापना करण्यात यावी. या समित्यांनी गौण खनिजाची अवैध वाहतूक आढळल्यास तहसीलदार किंवा पोलिसांना त्यांची माहिती द्यावी. भरारी पथकांना पोलिसांमार्फत सुरक्षा पुरविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. गौण खनिजाची अवैध वाहतूक आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही जिल्हाधिका:यांनी सांगितले. बैठकीस महसूल, प्रादेशिक परिवहन विभाग व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.