अखेर शिवसेनेने पूर्वीच्याच जागी बसवला पुतळा

By admin | Published: January 23, 2017 12:43 AM2017-01-23T00:43:42+5:302017-01-23T00:43:42+5:30

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जागेचा वाद : शिवसेना आक्रमक, पोलीस व आंदोलकांमध्ये काही काळ वाद

Lastly, Shiv Sena has put the statue in the earlier place | अखेर शिवसेनेने पूर्वीच्याच जागी बसवला पुतळा

अखेर शिवसेनेने पूर्वीच्याच जागी बसवला पुतळा

Next

नंदुरबार : पालिकेच्या जुन्या इमारतीवर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याच ठिकाणी अर्थात आताच्या नवीन व्यापारी संकुलातच बसवावा या मागणीसाठी रविवारी शिवसेनेने अचानक आंदोलन केले. शिवसेनेने आणलेला शिवरायांचा पुतळा शिवसैनिकांनी बसविण्याचा प्रय} केला. या वेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. तणाव लक्षात घेता  सध्या शिवसैनिकांच्या मागणीनुसार नवीन व्यापारी संकुलातच पुतळा पुनस्र्थापित करण्यात आला.
पालिकेच्या जुन्या इमारतीवर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धपूर्णाकृती पुतळा होता. या भागातून कुठलीही मिरवणूक, मोर्चा, रॅली गेल्यास शिवरायांना अभिवादन करूनच ती पुढे जात होती. सध्या असलेला नाटय़गृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याआधी हाच अर्धपूर्णाकृती पुतळा एकमेव होता. त्यामुळे शिवभक्तांची त्यावर श्रद्धा होती. परंतु पालिकेने जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्थात व्यापारी संकुल उभारल्याने हा पुतळा तात्पुरत्या स्वरूपात आता पालिकेची इमारत आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आला. सुरुवातीला पुतळा बंदिस्त खोलीत होता, नंतर नागरिकांच्या मागणीवरून मोकळ्या जागेत ठेवण्यात आला. हाच पुतळा पूर्वी होता त्याच ठिकाणी पुनस्र्थापित करावा, अशी मागणी गेल्या वर्षभरापासून करण्यात येत आहे. शिवसेनेने याबाबत वेळोवेळी आंदोलनदेखील केले आहे.
शिवसेनेने आणला पुतळा
पालिका त्यांच्या ताब्यात असलेला शिवरायांचा पुतळा बसवत नाही हे लक्षात घेता शिवसेनेने तसाच हुबेहुब पुतळा तयार करून तो रविवारी सकाळी 11 वाजता पालिका चौकात आणला. सोबत पुतळा ठेवण्यासाठी लोखंडी स्टॅण्डदेखील आणले. सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांकडून पालिका चौक शिवगजर्नेने दुमदुमला होता. आक्रमक शिवसैनिक पाहता लागलीच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. पुतळा बसविण्याचा प्रयत्न करणा:या शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलीस पुढे सरसावले. पुतळा ताब्यातही घेतला. परंतु शिवसैनिकांनी पोलीस वाहनासमोर ठिय्या धरला. पुतळा परत मिळत नाही तोर्पयत न हटण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, शिवाजी गावीत, पोलीस निरीक्षक संजय महाजन, मिलिंद वाघमारे यांच्यासह इतर अधिका:यांनी आंदोलनकत्र्याशी संवाद साधला. पालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी चौधरी यांना बोलविण्यात आले. अखेर पुतळा शिवसैनिकांनी मागणी केलेल्या ठिकाणीच ठेवण्यात आला. या वेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक गवते, जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांच्यासह देवेंद्र जैन, माजी नगरसेवक श्याम मराठे, चारूदत्त कळवणकर, तालुकाप्रमुख रमेश पाटील आदी उपस्थित होते.
परिसरात तणाव
या घटनेमुळे परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा ताफा, वाहने आणि शिवसैनिकच सर्वत्र दिसत होते. यामुळे मंगळबाजार, सुभाष चौक परिसरात तणावाचे वातावरण होते. तासाभरानंतर ते निवळले.
पुतळा बसविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन आणि पालिका आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.
तात्पुरत्या स्वरूपातील पुतळा
सध्या बसविण्यात आलेला पुतळा हा तात्पुरत्या स्वरूपातील   आहे. येत्या काळात पालिकेने या ठिकाणी सुशोभिकरण करून  पूर्वीचाच पुतळा बसविला नाही तर शिवसेना त्या ठिकाणी पंचधातूचा पुतळा तयार करून बसविणार असल्याचेही डॉ.विक्रांत मोरे यांनी सांगितले.

पालिका व शिवसेनेची भूमिका..
शिवभक्तांची भावना लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी बसवावा, अशी मागणी आहे. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिवसेनेने आंदोलनही तापविले आहे. पालिकेने व्यापारी संकुल तयार करतानाच पुतळ्यासाठी जागा राखून ठेवणे आवश्यक होते असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
पालिकेच्या म्हणण्यानुसार, पुतळा पालिका इमारतीवर होता. त्यामुळे नवीन आधुनिक स्वरूपात पालिका इमारत तयार होईल त्यावेळी तेथे सन्मानाने छत्रपतींचा हा पुतळा बसविण्यात येणार आहे. परंतु पालिका इमारतीसाठीच्या जागेचा वाद न्यायालयात असल्यामुळे इमारत उभी राहण्यास अडचण आली आहे. त्यामुळे पुतळा सध्याच्या पालिका आवारात ठेवण्यात आला असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.


शिवसेनेने जनतेला दिलेला शब्द पाळला. आता येणा:या काळात पालिकेने या ठिकाणी सुशोभिकरण करून महाराजांचा पूर्वीचा पुतळा बसवावा. मागणी कोण करतो हे न पाहता छत्रपती शिवाजी महाराज सर्वाचेच आहे ही भावना लक्षात घेऊन आता पालिकेने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. अन्यथा शिवसेनेचे आंदोलन कायम राहणार आहेच.
-डॉ.विक्रांत मोरे,
जिल्हाप्रमुख, शिवसेना

Web Title: Lastly, Shiv Sena has put the statue in the earlier place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.