रंगावली नदीवरील पुलाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:50 AM2017-08-31T10:50:39+5:302017-08-31T10:50:39+5:30
चार कोटी खर्च : आदिवासी विकास निधीतून नवापूर शहरातील पूल
ऑनलाईन लोकमत
31 ऑगस्ट
नवापूर : चार कोटी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या रंगावली नदीवरील स्व.केशवराव गावीत सेतू पुलाचे लोकार्पण आमदार सुरूपसिंग नाईक व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
तालुक्याच्या पश्चिम भागास शहराशी जोडण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून या पुलासाठी चार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. या वेळी आमदार नाईक, माजी केंद्रीयमंत्री गावीत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा रेणुका गावीत, माजी नगराध्यक्ष विपीन चोखावाला, पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, माजी नगराध्यक्ष दामू बि:हाडे, गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्ष प्रमुख नरेंद्र नगराळे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आर.सी. गावीत, जिल्हा परिषद सदस्य रतन गावीत, माजी नगरसेवक विनय गावीत, माजी उपनगराध्यक्ष फारूक शाह, शैलाबाई टिभे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, नगरसेवक व नगरसेविका आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात गिरीष गावीत यांनी पुलाच्या उभारणीतील घडामोडींची माहिती देत आदिवासी विकासमंत्र्यांचे आभार मानले. सर्वात उपयुक्त काम असा उल्लेख करून विपीन चोखावाला यांनी मागील काळात शहरात लोकविकासाची अनेक कामे झाल्याचे सांगितले. भरत गावीत यांनी पुलाच्या उभारणीने आमदार नाईक यांनी दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. पाच वर्षात अनेक कामे झालीत. विकासाची अनेक कामे दृष्टीपथास येत असतानाही विरोधक काम झाली नसल्याची टिका करीत असल्याची खंतही व्यक्त केली. शहरात सौरदिवे बसविण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. शिरीष नाईक यांनी विकास कामांमध्ये तुलनात्मक नवापूर पालिका अग्रेसर असल्याचे सांगितले. शिरपूर, नंदुरबार नंतर नवापूरचा उपक्रम येतो, असे ते म्हणाले.
माणिकराव गावीत यांनी लोकविकासाची कामे करणे सोपे नसते, असे सांगून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी योजना होत आहे. जलशुद्धीकरण योजनेचे पाणी स्वतंत्रपणे वितरणासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यासाठी योजना करावी लागणार आहे, असे सांगितले.
उद्घाटनपर मनोगतात आमदार नाईक यांनी या सेतुच्या उभारणीमुळे परिसरातील ग्रामीण भागातील जनतेसाठी चांगली सोय झाली आहे, असे सांगितले. ग्राम पंचायत असतानाच्या काळापासून नवापूरच्या विकासासाठी प्रय}रत असल्याचे म्हणाले. आगामी काळात विकास कामे करणारे प्रतिनिधी लोकांसमोर आणू, असे सांगून जनतेचा निर्णय मान्य करू, असे म्हणाले. पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावीत, माजी नगरसेवक भालचंद्र गावीत, विजया सोनार, मिराबाई गावीत, ज्येष्ठ नागरिक जी.के. पठाण, विक्रम पाटील, विनायक गावीत, डॉ.वसंत गावीत आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण तर आभार आरिफ बलेसरिया यांनी मानले.