ई-ईपीक ओळखपत्राचा शुभारंभ मतदार दिवस ; विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 02:10 PM2021-01-27T14:10:56+5:302021-01-27T14:11:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक असून, युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान ...

Launch of e-Epic ID card Voters Day; Glory to the winners of various competitions | ई-ईपीक ओळखपत्राचा शुभारंभ मतदार दिवस ; विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

ई-ईपीक ओळखपत्राचा शुभारंभ मतदार दिवस ; विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक असून, युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान करावे आणि मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले. यावेळी ई-ईपिक ओळखपत्र जिल्ह्यात वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला.
तहसील कार्यालय नंदुरबार येथे आयोजित ११ व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार राहुल वाघ आदी उपस्थित होते. डॉ. भारूड म्हणाले, जिल्ह्यात दुर्गम भागात मतदान केंद्र असूनही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करीत मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्याने सर्वांत चांगले काम केले. 
नागरिकांनी मतदानात   उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यास लोकशाही बळकट होईल, असे ते म्हणाले. यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धांमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात ज्येष्ठ मतदार व नवमतदारांना ई-एपीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली. 
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाचे, तसेच नूतन तहसील कार्यालयाच्या सभागृहाचे उद्घाटन करण्यात     आले. डॉ. भारूड यांनी यावेळी अभिलेख कक्षाची पाहणी केली. प्रास्ताविकात थोरात यांनी मतदार दिवस आयोजनाबाबत माहिती  दिली. दरम्यान, मतदार दिनानिमित्त इतरही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

Web Title: Launch of e-Epic ID card Voters Day; Glory to the winners of various competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.