शहाद्यात हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 01:10 PM2020-04-19T13:10:36+5:302020-04-19T13:10:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा तालुका खरेदी-विक्री संघात शासकीय नाफेडच्या हरभरा (चना) खरेदी केंद्राचे उद्घाटन शनिवारी संघाचे अध्यक्ष ...

Launch of Gram Shopping Center in Martyrs | शहाद्यात हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

शहाद्यात हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा तालुका खरेदी-विक्री संघात शासकीय नाफेडच्या हरभरा (चना) खरेदी केंद्राचे उद्घाटन शनिवारी संघाचे अध्यक्ष राजाराम तुकाराम पाटील यांच्या हस्ते काटापूजन करुन करण्यात आले. हरभरा प्रती क्विंटल चार हजार ८७५ दराने खरेदी केला जाणार असून एका शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त २५ क्विंटल खरेदी केला जाणार आहे. त्यासाठी सातबारा उताºयावर नोंद असणे आवश्यक आहे.
नाफेडच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेली होती. त्यापैकी आॅनलाईनने एसएमएसव्दारे आमंत्रीत केलेले पहिले १३ शेतकरी तसेच संघाचे व्यवस्थापक अनिल सुदाम पाटील उपस्थित होते. शासकीय खरेदी केंद्रात हरभरा खरेदीसाठी तालुक्यातील जवळपास ७५० शेतकºयांनी नोंदणी केलेली आहे. नोंदणी करण्याची अंतीम मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे. नोंदणी झालेल्या शेतकºयांपैकी क्रमाने एसएमएसव्दारे खरेदी केंद्रावर आमंत्रीत केले जाणार आहे.
नाफेडकडून हरभराला चार हजार ८७५ रुपए प्रती क्विटलप्रमाणे भाव जाहीर केलेला असून एका शेतकºयाकडून एक एकरला साडेचार क्विंटल व कमाल २५ क्विंटल या मर्यादेत हरभरा खरेदी केली जाणार आहे. नोंदणीकरीता ७/१२ उतारा व त्यावर हरभरा पीकपेराचा उल्लेखीत आॅनलाईनचा व त्यावर तलाठी यांची सही-शिक्का असणे आवश्यक आहे. तसेच सोबत आधारकार्ड व बँक पासबुकची छायांकीत प्रत जोडण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकºयांना आपला माल खरेदी केंद्रावर आणणेसंदर्भातचा मेसेज येईल त्यांच्याच मालाची खरेदी केली जाणार आहे. याव्यतिरिक्त इतर शेतकºयांनी मेसेज आल्याशिवाय माल आणू नये.

हमाल व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी
सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीत खरेदी केंद्रावरील सर्व हमाल तसेच कर्मचारी व येणारे शेतकरी यांनी स्वत:हून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने तोंडाला रुमाल किंवा मास्क वापरावे. केंद्रावर डेटॉल व साबण इत्यादीने वारंवार हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दर आठवड्याला स्थानिक आरोग्य विभागाचे डॉक्टर्स यांना बोलवून हमाल व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल, अशी माहिती संघाचे व्यवस्थापक अनिल पाटील यांनी दिली.

Web Title: Launch of Gram Shopping Center in Martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.