करंजी येथे 80 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:50 AM2018-03-14T11:50:14+5:302018-03-14T11:50:14+5:30

करंजी बुद्रुक : गावाच्या विकासासाठी आपसातील मतभेद विसरावे

Launch of various works of 80 lakhs in Karanjya | करंजी येथे 80 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

करंजी येथे 80 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 14 : तालुक्यातील करंजी बुद्रुक गटात 80 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते करण्यात आला़
जिल्हापरिषद जनसुविधा योजनेअंतर्गत चौकी येथे नवीन ग्रामपंचायत इमारतही या निधीअंतर्गत बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े या वेळी पंचायत समितीचे उपसभापती दिलीप गावीत, काँग्रसेचे तालुका उपाध्यक्ष आर.सी.गावीत, सरपंच सुनील गावीत, उपसरपंच दारासिंग गावीत, रवी गावीत, ग्राम पंचायत सदस्य मगन गावीत, सुनिता गावीत, दिनु गावीत,  वसंत गावीत, अनिल गावीत, दिलवरसिंग गावीत, रोहीनी गावीत, कुंतीबाई गावीत, सहाय्यक अभियंता शरद चव्हाण, ग्रामसेवक अरुण मोहिते आदी उपस्थित होते. 
करंजी बुद्रुक गटात कोटखांब येथे स्मशानभुमीर्पयत रस्ता काँक्रीट करणे, कामोद ते  स्मशानभूमी र्पयत रस्ता काँक्रीट करणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. 
करंजी बुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण भरत गावीत यांनी सरपंच रमिला गावीत, दिलीप गावीत व आर.सी.गावीत यांच्या उपस्थितीत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जोकु गावीत, समुवेल गावीत, रमेश गावीत, नामीबाई गावीत, आलु गावीत, नजुबाई गावीत, रसुबाई गावीत, सुनिता गावीत, हेमलता कुंवर, नारायण गावीत, रविदास गावीत, पाण्या गावीत, छगन गावीत, शांताराम कुंवर, ग्रामसेवक विजय गावीत आदी उपस्थित होते. 
याच वेळी ग्रामपंचायतीच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  भरत गावीत म्हणाले की, गावाच्या विकासात ग्रामपंचायत इमारतीच्या रुपाने अजून एका इमारतीची भर पडली आहे. या इमारतीचा उपयोग विकास कामांसाठी करावा, तसेच संरक्षण भितीचे कामही चांगले दज्रेदार करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: Launch of various works of 80 lakhs in Karanjya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.