घरफोडीच्या गुन्ह्यातील तिघा अट्टल चोरटय़ांना एलसीबीकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:15 PM2019-08-29T12:15:05+5:302019-08-29T12:15:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोटरसायकल चोरीसह घरफोडीचा गुन्हा करणा:या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बसस्थानक परिसरातून ताब्यात ...

LCB arrested on three burglaries in connection with burglary | घरफोडीच्या गुन्ह्यातील तिघा अट्टल चोरटय़ांना एलसीबीकडून अटक

घरफोडीच्या गुन्ह्यातील तिघा अट्टल चोरटय़ांना एलसीबीकडून अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोटरसायकल चोरीसह घरफोडीचा गुन्हा करणा:या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतल़े तिघांकडून चोरीचे तीन गुन्हे केल्याची कबुली देण्यात आली़ 
एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले हे पोलीस पथकासह गत आठवडय़ापासून नंदुरबार शहरात गस्त करत असताना बसस्थानक परिसरात तिघे संशयित फिरत असल्याचे दिसून आले होत़े तिघांची गोपनीय माहिती काढली असता, तिघेही अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार 27 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिघेही बसस्थानकासमोर असलेल्या भिंतीजवळ बसल्याचे पथकाला दिसून आले होत़े तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली होती़ परंतू पोलीसांनी कसून चौकशी केल्यानंतर गोरख खंडू संसारे, शिवा राजू बहुरे दोघे रा़ दोंडाईचा व आज्या सलीम खाटीक रा़ दोंडाईचा अशी नावे सांगितली़ तिघांनी नंदुरबार शहरातील एलिझाबेथ नगरात दीड वर्षापूर्वी, शहादा शहरात महिन्याभरापूर्वी तर नंदुरबारातच बायपास रस्त्यालगत वसाहतीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली होती़ तिघांनी निलेश संसारे, अकील व मनोज नामक तिघांसोबत घरफोडय़ा केल्याची कबुली दिली आह़े पोलीसांकडून तिघांचा शोध सुरु असून त्यांच्याकडून शहादा व नंदुरबार येथील आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती देण्यात आली़ 
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल दिपक गोरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, संदीप लांडगे, मोहन ढमढेरे, विजय ढिवरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, किरण मोरे यांनी केल़े 
गुन्हेगारांना अटक करणा:या एलसीबीच्या पथकास पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडून रोख बक्षिस जाहिर करण्यात आले आह़े 
 

Web Title: LCB arrested on three burglaries in connection with burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.