वून देण्याच्या बहाण्याने गुजरातमध्ये घरफोडी करणारा जेरबंद एलसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:50 PM2020-09-30T12:50:28+5:302020-09-30T12:50:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कपाटाची चावी बनवून देण्याच्या बहाण्याने घरात घुसून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कपाटाची चावी बनवून देण्याच्या बहाण्याने घरात घुसून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे़ गुजरात राज्यातील डेडियापाडा येथे ही घरफोडी झाली होती़ संशयितास शहर बसस्थानकातून ताब्यात घेण्यात आले आहे़
दिलवरसिंग उदयसिंग शिकलीकर रा़शिखफळी, अक्कलकुवा असे चोरट्याचे नाव आहे़ दिलवरसिंग याने गुजरात राज्यातील डेडियापाडा व परिसरात कपाटाच्या लॉकरची चावी बनवून देण्याच्या बहाण्याने घरात घुसून ८२ हजार रूपयांची घरफोडी केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ संशयित दिलवरसिंग हा नंदुरबार शहरात वास्तव्यास असल्याचे समजून आल्यानंतर त्यांनी बसस्थानक परिसरात सापळा लावला होता़ यादरम्यान २६ सप्टेंबर रोजी दिलवरसिंग हा सापळ्यात अडकला होता़ त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता अजीतसिंग शिकलीकर रा़ बडवानी याच्यासोबत डेडियापाडा परिसरात चोरी केल्याची कबुली दिली होती़ त्याच्याकडून नंदुरबार जिल्ह्यासोबतच गुजरात राज्यातील विविध भागात केलेले गुन्हे चौकशीदरम्यान समोर आल्याची माहिती आहे़ संशयितास गुजरात राज्यातील नर्मदा जिल्हा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ दुसरा संशयित अजीतसिंग याची माहिती मध्यप्रदेश पोलीसांना कळवण्यात आली असून तो फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ ही कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, आनंदा मराठे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली़