तार चोरीच्या गुन्ह्यातील दोघे एलसीबीच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:17 PM2019-10-15T12:17:51+5:302019-10-15T12:17:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पवन ऊर्जा प्रकल्पातून तांब्याची तार चोरुन विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दोघा गुन्हेगारांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पवन ऊर्जा प्रकल्पातून तांब्याची तार चोरुन विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दोघा गुन्हेगारांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतल़े गुरुवारी सायंकाळी झालेल्या या कारवाईत दोघांकडून पथकाने अडीच लाख रुपयांचा जप्त केला आह़े
इमरान शिराज खाटीक व गणेश तुकाराम धनगर दोन्ही रा़ शनिमांडळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़ नंदुरबार तालुक्यातील सुझलॉन या पवन ऊर्जा प्रकल्पातून चोरलेली तांब्याची तार एमएच 03-एएफ-8243 या वाहनाने दोंडाईचा येथे दोघे विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने वावद ता़ नंदुरबार येथे दोंडाईचा-नंदुरबार रस्त्यावर सापळा रचून इमरान व गणेश या दोघांना ताब्यात घैतल़े वाहन तपासणी दरम्यान डिक्कीत 41 हजार 312 रुपयांची 51 किलो तांब्याची तार ताब्यात घेण्यात आली़
2 लाख रुपयांच्या वाहनासह दोघांकडून ताब्यात घेतलेली तार असा एकूण 2 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला़ दोघांची चौकशी केली असता, ही तार शेखर श्रीराम माळी रा़ शनिमांडळ याने चोरुन आणून दिल्याची कबुली दोघांकडून देण्यात आली आह़े दोघांना तालुका पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले असून फरार शेखर माळी याचा पोलीसांकडून शोध घेतला जात आह़े येत्या काळात तार चोरीचे मोठे गुन्हे उघडकीस येणार असल्याचा अंदाज पथकाने वर्तवला आह़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, किरण मोरे यांनी केली़