नंदुरबार तालुक्यात 33 वर्षानंतर दिसला पट्टेदार वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:34 PM2018-07-24T13:34:49+5:302018-07-24T13:34:54+5:30

Leader seen in Nandurbar taluka after 33 years | नंदुरबार तालुक्यात 33 वर्षानंतर दिसला पट्टेदार वाघ

नंदुरबार तालुक्यात 33 वर्षानंतर दिसला पट्टेदार वाघ

Next

नंदुरबार : गावशिवारात हिंस्त्र प्राणी लपून बसला असल्याने त्याला पळवण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थ आणि अधिकारी यांच्यासमोर थेट ‘पट्टेदार वाघ’ प्रकट झाल्यानंतर एकच धावपळ उडाली़ पळापळीत एकाच्या पाठीवर वाघाचा पंजा लागल्याने तो जखमी झाला़ कोकणीपाडा ता़ नंदुरबार येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली़ तब्बल 33 वर्षानंतर जिल्ह्यात वाघाचे अस्तित्व दिसून आल्याने  खळबळ उडाली आह़े 
रविवारी दुपारी वनविभाग, पोलीस दलाचे अधिकारी यांना कोकणीपाडा शिवारात ग्रामस्थ लाठय़ा-काठय़ा घेत हिंस्त्र प्राण्याचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली होती़  माहिती मिळाल्यानंतर 3 वाजेच्या सुमारास वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे किशोर नवले, हे कोकणीपाडा येथे दाखल झाले होत़े तिघे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ हे गावाजवळ  शोध घेत असताना सायंकाळी गावालगतच्या टेकडय़ावरील  झुडूपात हिंस्त्र प्राणी झोपला असल्याचे दिसून आल़े  पोटावर काळे-पिवळे पट्टे असल्याने तो ‘तरस’ असा असावा अंदाज व्यक्त  करण्यात आला़ त्याला हुसकावून लावण्यासाठी वन कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच झुडूपातून पट्टेदार वाघ बाहेर आला़ डरकाळी फोडून, गुरगुरतच टेकडय़ावरून पळणा:या  वाघाला पाहिल्यानंतर ग्रामस्थ मिळेल त्या मार्गाने गावाकडे पळत सुटले होत़े याचदरम्यान दगडाआड असलेल्या भिमसिंग सुक््रया चौधरी (कोकणी) यांच्या पाठीवर वाघाचा पंजा लागल्याने ते जखमी झाल़े घटनेनंतर वनविभागाने या भागात शोध मोहीम सुरू करत पथकांची नियुक्ती केली आह़े जिल्ह्यात 1985 मध्ये चरणमाळ ता़ नवापूर येथील वनक्षेत्रात वनविभागाच्या अधिका:यांना वाघ दिसून आला होता़ यानंतर नंदुरबार जिल्ह्यात वाघ आढळून आलेले नाहीत़ कोकणीपाडा येथे आढळून आलेला वाघ हा डांगच्या जंगलातून नवापूर मार्गाने आला असावा असा अंदाज आह़े
वनविभागाकडून शिरवाडे, कोकणीपाडा, उमर्दे, जळखे या गावांमध्ये शोधमोहिम हाती घेण्यात आली आह़े तसेच या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े प्रामुख्याने वाघ हा जंगलातच परत जाण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आह़े सोमवारी पहाटे 3 वाजेर्पयत वनविभागाच्या अधिका:यांची शोधमोहीम सुरू होती़ यात ठिकठिकाणी वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत़ उपवनसंरक्षक एस़बी़केवटे, सहायक उपवनसंरक्षक रणदिवे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह वनविभागाची आठ पथके या गावांमध्ये थांबून आह़े 
वनविभागाने सोमवारी सकाळपासून शिरवाडे, कोकणीपाडा भागात ड्रोन कॅमेरे लावून वाघाचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आह़े परंतु अद्याप त्यांना यश आलेले नाही़ 

Web Title: Leader seen in Nandurbar taluka after 33 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.