पर्यावरण दिनी कर्मचा-यांना पगारी सुटी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:57 PM2018-06-06T12:57:39+5:302018-06-06T12:57:39+5:30
जिल्हाधिका:यांना निवेदन : आदिवासी एकता परिषदेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात दरवर्षी साज:या होणा:या जागतिक पर्यावरण दिनी औद्योगिक कर्मचा:यांना पगारी सुटी देऊन सर्व कारखाने एका दिवसासाठी बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी आदिवासी एकता परिषदेच्यावतीने करण्यात आली़ जिल्हाधिकारी यांना मंगळवारी परिषदेच्या पदाधिका:यांनी निवेदन दिल़े
निवेदनात म्हटले आहे की, 5 जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व इतर सर्व कार्यालयातील सर्व एसी बंद ठेवण्यात यावेत, पर्यावरण दिनी भर पगारी औद्योगिक सुटी जाहिर करण्यात यावी, पर्यावरण कायदे तोडणा:यांवर कारखान्यांवर आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात यावी, जिल्ह्यातील वृक्ष लागवडीची व्यापक मोहिम हाती घेण्यात यावी, प्राधान्याने इथल्या मातीतील फळझाडे लावण्यासाठी गावांना प्रोत्साहन द्यावे, पाणी हे जीवन असल्याने नदी नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवावे, नदी-नाल्यांचे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना करवी, वाळू उपसा थांबवून माफियांवर कारवाई करावी, वनक्षेत्रांचे संरक्षण, संवर्धन हे आदिवासींच्या पांरपरिक अधिकार संरक्षणातून होऊ शकत़े यासाठी अनुसुचित क्षेत्रातील पेसा कायद्यात केली जाणारी अनावश्यक ढवळाढवळ थांबवण्यात यावी, अनुसुचित क्षेत्रांचे अधिकारी अबाधित ठेवण्यात यावेत, गावपातळीवर स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, ओसाड टेकडय़ा, रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी झाडे लावण्याचे आदेश द्यावेत, राष्ट्रहितासाठी शेतक:यांना 1 ते 2 एकरात झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करावे, घरकुल लाभार्थी व प्रत्येक कर्मचा:यास एक झाड लावण्याचा प्रवृत्त करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़