विसरवाडी, चिंचपाडा व वडफळी येथे कायदेविषयक शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:27+5:302021-09-21T04:33:27+5:30
नवापूर तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीमार्फत ग्रामपंचायत विसरवाडी, ग्रामपंचायत चिंचपाडा, ग्रामपंचायत वडफळी, साई कॉम्पिटिशन अकॅडमी विसरवाडी, आश्रय दुर्ग बहुउद्देशीय ...
नवापूर तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीमार्फत ग्रामपंचायत विसरवाडी, ग्रामपंचायत चिंचपाडा, ग्रामपंचायत वडफळी, साई कॉम्पिटिशन अकॅडमी विसरवाडी, आश्रय दुर्ग बहुउद्देशीय सामाजिक संस्थाद्वारा देवलीमाडी पेट्रोल पंप विसरवाडी असे एकाच दिवशी पाच ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. या वेळी सरकारी वकील सूरडकर यांनी आदिवासी समाजात मातृसत्ताक पद्धत अवलंबिली जाते. वैवाहिक वाद मध्यस्थ आणि समाज पद्धतीने मिटविले जातात, असे सांगितले. तसेच सेवा प्राधिकरणामार्फत अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा व्यक्तींना स्त्रिया अथवा बालके, औद्योगिक कामगार, अवैध मानवी व्यापारी बळी किंवा भिकारी, अपंग व्यक्ती इत्यादींना समितीमार्फत विविध सेवा पुरवली जाते, असे सांगितले. नवापूर वकील संघाचे अध्यक्ष अॅड.रामू वळवी यांनी स्थानिक आदिवासी भाषेत विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती दिली. जे वाद न्यायालयात आणले गेले नाहीत अशा वादांमध्येही समझोता करीत लोकन्यायालय आयोजित केले जाते, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन सोमू गावीत यांनी तर आभार आश्रय दुर्ग संस्थेमार्फत के.टी. गावीत यांनी मानले. या वेळी नवापूर न्यायालयाचे सचिव अॅड.पी.जी. गावीत, सदस्य ॲड. डी. के. गावीत, लिपिक आर.एस. सोनवणे, एच.ए. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.