तळोदा तालुक्यात विधिसेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:38+5:302021-09-21T04:33:38+5:30

काझीपूर, ता.तळोदा येथील ग्रामपंचायत कार्यालय, तलावडी येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचालित अनुदानित आश्रमशाळा, रोझवा व रोझवा पुनर्वसन ...

Legal guidance camp on behalf of Legal Services Committee in Taloda taluka | तळोदा तालुक्यात विधिसेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

तळोदा तालुक्यात विधिसेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

Next

काझीपूर, ता.तळोदा येथील ग्रामपंचायत कार्यालय, तलावडी येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचालित अनुदानित आश्रमशाळा, रोझवा व रोझवा पुनर्वसन येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार, कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचालित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत विशेष विधिसेवा शिबिरांतर्गत विविध कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, तळोदा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी आर.डी. सोनवणे, तसेच तळोदा वकील संघाचे सचिव ॲड. सी.बी. आगळे उपस्थित होते.

पाचही ठिकाणच्या कार्यक्रमात उपस्थितांना विविध दिवाणी व फौजदारी कायदे, शिक्षण हक्क कायदा, लैंगिक अत्याचार कायदा, घरगुती हिंसाचार, महिलांचे संरक्षण कायदे, ज्येष्ठ नागरिकांचे कायदे, विविध मोटार वाहन कायदे, रॅगिंगविषयी कायदे, भारतीय दंड विधान संहितेमधील विविध कलमांबाबत, अटकेतील आरोपीचे अधिकार, विधिसेवा समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत, तसेच मध्यस्थता केंद्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना या संसर्गजन्य आजारापासून वाचण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना, तसेच नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी ॲड.के.पी. बैसाणे, ॲड. एस.एन. पवार, ॲड. एस.पी. वसावे, ॲड. आर.आर. मगरे, ॲड. एम.बी. पवार, तसेच गावातील ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Legal guidance camp on behalf of Legal Services Committee in Taloda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.