धुरखेडा शिवारात पाच वर्षीय बालकावर बिबटय़ाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:03 PM2018-12-30T13:03:48+5:302018-12-30T13:03:54+5:30
उपचार सुरु : ऊसतोड सुरु असताना केला हल्ला
शहादा : तालुक्यातील धूरखेडा शिवारात ऊसतोडणी सुरु असताना मजूराच्या पाच वर्षीय मुलावर बिबटय़ाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली़ घटनेने खळबळ उडाली असून वनविभागाने बिबटय़ाचा शोध सुरु केला आह़े दरम्यान जखमी झालेल्या बालकाची प्रकृती गंभीर आह़े
धुरखेडा शिवारातील भगवान नथू पाटील यांच्या शेतात शनिवारी ऊस तोड सुरु होती़ सकाळी 10 वाजेच्या सुमारास ऊसतोड करणारे मजूर रूपसिंग हावल्या पराडके रा़ गौ:यामाळ ता़ धडगाव यांचा पाच वर्षीय मुलगा तुषार परिसरात खेळत असताना अचानक ऊसातून बाहेर आलेल्या बिबटय़ाने त्याच्यावर हल्ला करत ओढून नेण्याचा प्रयत्न केला़ हल्ल्यात बिबटय़ाने हातावर चावा घेत छातीवर पंजाने वार केल्यानंतर तूषार याने रडण्यास सुरुवात केली़ ही बाब ऊसतोड करणा:या मजूरांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी हत्यारांच्या सहाय्याने बिबटय़ाला पळवून लावल़े परंतू तोवर बालकाच्या मान आणि छातीवर पंजा मारल्याने गंभीर जखमा झाल्या होत्या़ जखमी तुषार यास तात्काळ शहाद्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल़े त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आह़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने धुरखेडा शिवारात भेट दिली़ त्यांच्याकडून बिबटय़ाच्या पावलाचे ठसे घेऊन माग काढण्यात आला़ सहायक वनसंरक्षक एस़आऱचौधरी, वनक्षेत्रपाल अनिल पवार, वनरक्षक डी़डी़पाटील, वनपाल एस. एस. इंदवे, वनरक्षक एम़आऱमराठे, वनरक्षक क़ेएस़वसावे यांनी खाजगी रुग्णालयात जावून बालकाच्या जखमांची पाहणी करुन पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्याची तयारी दर्शवली़
दरम्यान घटनेमुळे परिसरातील शेतक:यांनी घाबरुन न जाता शेतशिवारात जाताना काळजी घेण्याचे सहायक वनसंरक्षक आऱएस़चौधरी यांनी कळवले आह़े