तळोद्यातील 67 ग्रामपंचायतींना पत्र : विकास कामांचा मागवला लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:08 PM2018-01-16T13:08:19+5:302018-01-16T13:08:24+5:30

Letter to 67 Gram Panchayats in Palluda: Development Works | तळोद्यातील 67 ग्रामपंचायतींना पत्र : विकास कामांचा मागवला लेखाजोखा

तळोद्यातील 67 ग्रामपंचायतींना पत्र : विकास कामांचा मागवला लेखाजोखा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : येथील महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिजाच्या वापराकडे आपला मोर्चा वळवला आह़े रोज वाहनांची तपासणी करण्यात येत असून दोषी आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आह़े            शिवाय तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना                पत्र पाठवून विकास कामांची माहिती तातडीने मागवली आह़े
तळोदा तालुक्यात अवैध गौणखनिजाच्या वाहतूक प्रकरणी येथील वरिष्ठ महसूल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तालुका महसूल प्रशासनाने तीव्र मोहिम हाती घेतली आहे. यासाठी ठिकठिकाणी कर्मचा:यांची पथके तयार करुन दोषी आढळणा:या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आह़े त्यामुळे साहजिकच यातून महसूल विभागाच्या उत्पन्नातही मोठी भर पडत                      आह़े 
प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. 
प्रशासनाने आता या अवैध गौणखनिज प्रकरणी तालुक्यातील ग्रामपंचायतींना लक्ष केले आह़े याचाच दाखला म्हणून, तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना तालुका महसूल प्रशासनाकडून नुकतेच पत्र पाठविण्यात आले आह़े ग्रामपंचायतींमार्फत मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरु करण्यात येत असताना त्यासाठी लागणा:या गौणखनिजांची रॉयल्टी भरली जात नसल्याचे प्रशासनाला आढळत आह़े 
त्यामुळे ग्रामपंचायतींमार्फत गेल्या वर्षी व यंदा 14 व्या वित्तआयोग तसेच पेसाअंतर्गत किती कामे झालीत?, सद्या किती कामे सुरु आहेत? या शिवाय घरकुलांच्या कामांची माहिती तातडीने सादर करुन अहवाल पाठवावा असे निर्देश तालुक्यातील ग्रामसेवकांना दिले आह़े याबाबतचे पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले  आह़े या माहितीसोबतच शासनाच्या वित्तआयोग, पेसा व इतर योजनांतर्गत मिळणा:या निधीतून अंतर्गत रस्ते, गटारी, विविध शाळांची बांधकामे शिवाय घरकुले, शौचालये आदी कामकाजांसाठी मिळणारे अनुदान खर्च केलेला निधी याची स्वतंत्र माहिती मागवली आह़ेसन 2016-2017 व 2017-2018 गौणखनिजसाठी शासनाकडे किती महसूल जमा केला त्याची चलनासह माहिती द्यावी असे आदेशही देण्यात आलेले आह़े त्यामुळे आता ग्रामपंचायतींना आपला सर्व लेखाजोखा सारद करावा लागणार आह़े
 

Web Title: Letter to 67 Gram Panchayats in Palluda: Development Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.