बोनमॅरोसाठी तळोदा येथील चिमुरडीची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ‘साद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:48 PM2017-12-10T12:48:14+5:302017-12-10T12:50:33+5:30
जिल्ह्यात 37 रूग्ण
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 10- कुपोषण आणि सिकलसेल यामुळे बेजार असलेल्या जिल्ह्यात गेल्या काही वर्षात थॅलेसिमिया आजार बळावतो आह़े दीर्घ काळ होणारे उपचार आणि त्यातून मिळणारे तुटपुंजे यश असा खेळ असलेल्या या आजाराचे जिल्ह्यात 37 रूग्ण असून या दुर्धर आजाराने पिडीत सात वर्षीय चिमुरडीने जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थॅलेसिमिया कडे लक्ष घालण्याची याचना केली आह़े
तळोदा येथील दीक्षा गणेश गुरव असे या सात वर्षीय बालिकेचे नाव असून तिने थॅलेसिमियाचे वास्तव यातून मांडले आह़े थॅलेसेमिया व सिकलसेल हे अनुवांशिक असे असाध्य आजार असून जिल्ह्यात 37 थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण असून दिक्षाही त्यांच्यापैकीच एक आह़े या रुग्णांचे हिमोग्लोबिन कमी कमी होते म्हणून त्यांना दर महिन्यास वयाप्रमाणे 1 किंवा 2 रक्ताच्या पिशव्या द्याव्या लागतात. तसेच त्यांची दर चार ते सहा महिन्यांनी शारीरिक तपासणी करावी लागते. या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक औषधे घ्यावी लागतात. हे सर्व करताना रुग्णांच्या पालकांची आर्थिक, शारीरिक व मानसिक ओढाताण होऊन असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रूग्णाला रक्त देण्यासाठी बालरोगतज्ञाकडे एका दिवसाकरीता दाखल करावे लागते. त्यासाठी 500 रूपयांर्पयत फी द्यावी लागते. बहुतांशी पालक गरीब असल्याने त्यांना डॉक्टरांची फी देता येत नाही. यासाठी धुळे येथे थॅलिसिमिया डे केअर सेंटर सुरू व्हावे, रुग्णांना रक्त दिल्यानंतर त्यांच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी लागणा:या डेसीरॉक्स ही औषधी नंदुरबार येथे उपलब्ध करण्यात याव्यात, रुग्णांना रक्त देतांना अनेक अनावश्यक रक्त घटक शरीरात जाऊन होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी लागणारे ल्यूकोसिट फिल्टर शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावे, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत प्रवासाची सवलत द्यावी, थॅलेसेमियाग्रस्त व सिकलसेलग्रस्त रुग्णांना धुळे येथील नवजीवन रक्तपेढी रक्ताचा पुरवठा करीत आहे. या रक्तपेढीमध्ये रक्ताच्या नॅट चाचणीची मोफत उपलब्धता करून देण्याची आवश्यकता असल्याचे दीक्षा हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आह़े
बोनमॅरोसाठी दात्याचा सुरू आहे शोध
थॅलेसेमियाग्रस्त दिक्षाला प्रत्येक महिन्याचे 20 किंवा 25 दिवस पूर्ण झाल्यानंतर रक्त लागत असते. तिला तिचे पुढचे आयुष्य सुरळीत जगण्यासाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपन अर्थात बोनमॅरो ट्रान्सप्लांट या शस्त्रक्रियेची आह़े अत्यंत गुंतागुत आणि महागडय़ा अशा या शस्त्रक्रियेसाठी थॅलेसिमियाग्रस्त व्यक्तीचा अस्थिमज्जा तिचा सख्खा भाऊ किंवा बहिणीशी जुळण्याची गरज असत़े मात्र दीक्षाच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीसोबत तिच्या पेशी जुळल्या नाहीत. त्यामुळे दिक्षा हिला अस्थिमज्जा प्रत्यारोपण अर्थात बोनमॅरो ट्रान्सप्लांट सजर्री करण्याची अत्यंत आवश्यकता आह़े मात्र बोनमॅरो दाता मिळत नसल्याने तिची परवड सुरू आह़े शासनाने तिला दाता उपलब्ध करून द्यावी अशी तिची मागणी असून यासाठी शासनदरबारी तिचे कुटूंबिय खेटे घालत आहेत़ तिला योग्य तो बोनमॅरो दाता मिळाल्यास जीवनदान मिळू शकते.