परवानाधारक व्यापा:यांच्या जिनिंग दुरुस्तीमुळे खरेदी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:00 PM2019-10-17T12:00:25+5:302019-10-17T12:00:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीने पळाशी ता़ नंदुरबार येथील खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु केलेली नसल्याने शेतकरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीने पळाशी ता़ नंदुरबार येथील खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु केलेली नसल्याने शेतकरी परत जात आहेत़ केंद्रातून कापूस खरेदी करणा:या व्यापा:यांच्या जिनिंगची दुरुस्ती सुरु असल्याने व्यवहार लांबवणीवर टाकण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े
पळाशी येथील खरेदी केंद्रावर बाजार समितीने परवाना दिलेले 4 व्यापारी आणि सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाकडून कापूस खरेदी करण्यात येत़े हंगामात याठिकाणी दरदिवशी 50 पेक्षा अधिक वाहनातून कापूस विक्रीसाठी आणला जातो़
यंदा पावसाने वेळावेळी हजेरी लावल्याने बोंड फुटून बाहेर आलेल्या कापसात ओलावा झाला होता़ ढगाळ वातावरणामुळे ओलावा कायम होता़ परंतू गत 10 दिवसात उन्हाचा कडाका वाढल्याने शेतक:यांना कापूस वेचणीची संधी मिळाली होती़ यातून दिवाळीपूर्वी कापूस विक्री होईल या उद्देशाने काही शेतकरी बाजार समितीच्या खरेदी केंद्रात आले होत़े परंतू येथे जिनिंग दुरुस्तीचे काम सुरु असल्याने व्यापारी कापूस खरेदी करत नसल्याची माहिती देण्यात आल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली़ खरेदी केंद्रावर आतार्पयत 1 हजार क्विंटल कापसाची खरेदी इतर दोघा व्यापा:यांनी करुन घेतल्याची माहिती देण्यात आली आह़े
याठिकाणी प्रती क्विंटल पाच हजार रुपयांच्या आत कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती आह़े परंतू खरेदीचा हंगाम अद्यापही पूर्णपणे सुरु झालेला नसल्याचे सांगण्यात आले आह़े
सूतगिरणीने भाव जाहिर केल्यानंतर येत्या आठवडय़ात खरेदी सुरु होण्याचा अंदाज आह़े दिवाळीनंतर सीसीआयकडूनही नंदुरबार आणि शहादा येथील कापूस खरेदी सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े