आयुष्यमान अभियानाची कार्यशाळा : तळोदा तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:11 PM2018-04-25T13:11:09+5:302018-04-25T13:11:09+5:30
दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना मिळणार महागडय़ा आरोग्य सेवेचा लाभ
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 25 : केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत पंचायत समितीच्या आरोग्य विभाग, ग्रामसेवक व आशा सेविकांची कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी या योजनेसाठी ग्रामसभेत ग्रामस्थांसाठी जनजागृती करण्याच्या सूचना कर्मचा:यांना देण्यात आल्या होत्या.
समाजातील दारिद्रय़ रेषेखालील घटकाला महागडी आरोग्य सुविधा मिळण्यासाठी केंद्र शासनाने यंदापासून आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य ही योजना सुरू केली आहे. हे अभियान विशेषत: ग्रामीण भागात राबविण्यासाठी येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने सोमवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचा शुभारंभ तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या अभियानांतर्गत 30 मे 2018 रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करायचे आहे. या ग्रामसभेत ग्रामसेवकांनी गावक:यांमध्ये माहिती देवून जनजागृती करायची आहे. त्यानंतर आशा सेविकांनी 1 ते 7 मे 2018 दरम्यान ग्रामसभेत न आलेल्या कुटुंबाची गृहभेट घेवून माहिती देण्याच्या सूचनादेखील कार्यशाळेत देण्यात आल्या. या कार्यशाळेत ताुलका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण व डॉ.तुषार मोरे यांनी मार्गर्दन केले. कार्यशाळेत डॉ.कांतीलाल पावरा, डॉ.रेखा शिंदे, डॉ.सोहम पाडवी, डॉ.विशाल चौधरी, डॉ.सायसिंग पावरा आदींसह तालुक्यातील अंगणवाडी सुपरवायझर, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आरोग्य विस्तार अधिकारी एस.पी. वाघ, आरोग्य सहायक पाडवी, मनोज पिंजारी, डी.बी. माळस्कर, अहिरे, काळे आदींनी परिश्रम घेतले.