विद्याथ्र्याची सर्रास होतेय जीवघेणी वाहतूक

By admin | Published: July 2, 2017 11:17 AM2017-07-02T11:17:58+5:302017-07-02T11:17:58+5:30

पालकांनीही लक्ष देण्याची गरज : स्कूल बसचा परवाना नसतानाही वाहनचालकांची मनमानी

The lifestyle of the student is very common | विद्याथ्र्याची सर्रास होतेय जीवघेणी वाहतूक

विद्याथ्र्याची सर्रास होतेय जीवघेणी वाहतूक

Next

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.2 - जिल्ह्यात सर्वत्र विद्याथ्र्याची असुरक्षितपणे वाहतूक केली जात आह़े ज्यांच्याकडे स्कूल बसचा परवाना नाही, अशा वाहनांमधूनही विद्याथ्र्याची जीवघेणी वाहतूक होत असल्याने विद्याथ्र्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे येत आहे. विद्याथ्र्याना रिक्षाचालक आपल्या आसनाच्या बाजूलाच बसवत आह़े याकडे वाहतूक शाखेचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आह़े 
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 86 वाहनांना स्कूल बसचा परवाना  आह़े परंतु, शहरासह जिल्ह्यात सर्रासपणे स्कूल बसचा परवाना नसलेल्या वाहनांमधून मोठय़ा प्रमाणावर विद्याथ्र्याची बिनधास्तपणे वाहतूक होत आह़े यामुळे शालेय विद्याथ्र्याच्या सुरक्षेचा प्रश्न यातून निर्माण होत आह़े शालेय विद्याथ्र्याची वाहतूक करणा:या वाहनांसाठी आरटीओने नियमावली जाहीर केली आह़े त्यानुसार, वाहनांना पिवळा रंग, तपकिरी रंगाची पट्टी तसेच शाळेच्या नावाचा उल्लेख असणे बंधनकारक आह़े बसमध्ये विद्याथ्र्याना स्कूल बॅग ठेवण्यासाठी जागा, आसनावर बसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण्यासाठी  रॉड, पूर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी वाहतूक करणा:या वाहनात महिला, प्रथमोपचार पेटी, अग्निरोधक यंत्र, वाहनचालकास पाच वर्षाचा अनुभव, वाहनात लहान मुलांना चढता येईल, अशी सोयीची पायरी असे काही नियम आखून देण्यात आले आह़े मात्र, हे सर्व नियम बिनधास्तपणे धाब्यावर बसविण्यात आले आहे. स्कूल बसचा परवाना नसलेल्या वाहनांमधून सर्रासपणे विद्याथ्र्याच्या जीवाशी खेळण्यात येत असून अशा वाहनचालकांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आह़े 

Web Title: The lifestyle of the student is very common

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.