नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार घरात प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:19 PM2018-03-06T12:19:12+5:302018-03-06T12:19:12+5:30
ग्रामज्योती : 40 कोटींच्या निधीतून विविध कामे
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 6 : दिनदयाल ग्राम ज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 14 हजार 700 वीज ग्राहकांना लाभ मिळाला आहे. या योजनेसाठी वीज वितरण कंपनीने जिल्ह्याला 40 कोटी 26 लाख रुपये निधी मंजुर झाला आहे.
जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अनेक भागात वीज पोहचू शकत नाही. त्यामुळे अनेक गावे व पाडे अद्यापही अंधारात आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वीज उपकेंद्र आणि रोहित्रांची देखील कमतरता आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यात देखील अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेता जिल्ह्याला पंडित दिनदयाल ग्राम ज्योती योजना मंजुर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आता विजेची विविध कामे करण्यात येत आहे.
जिल्ह्याला सन 2030 र्पयत लागणा:या विजेचा आराखडा तयार करून त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गतच दिनदयाल ग्राम ज्योती योजनेचेही काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 40 कोटी 26 लाख रुपये निधीतून कामे करण्यात येत आहेत. याअंतर्गत गावठाण फिडर विलगीकरणाचे 34 प्रस्ताव आहेत. ही कामे प्रगतीपथावर आहेत. 33 के.व्ही.उपकेंद्र चार असून त्यांचीही कामे सुरू करण्यात आली आहेत. याअंतर्गत एकुण 14 हजार 700 ग्राहकांना त्याचा फायदा मिळणार आहे.
राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन महिन्यांपूर्वी नंदुरबारात आले असता त्यांनी या कामांचा आढावा घेवून अधिका:यांना सुचना केल्या होत्या. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पहाता 61 गाव आणि 235 पाडय़ांना अद्यापही वीज पुरवठा होऊ शकलेला नाही. येत्या वर्षात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी मंजुर करून 17 गावांना वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे ज्या पाडय़ात वीज पोहचू शकणार नाही अशा ठिकाणी सौर उज्रेचा वापर करण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी नियोजनही करण्यात आले आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत देखील विविध ठिकाणी वीज उपकेंद्र आणि रोहित्रांची संख्या वाढविण्यात येत आहे.