हलक्या प्रतीचा कांदा आल्याने व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:21 PM2019-12-05T12:21:32+5:302019-12-05T12:21:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात बुधवारी तब्बल ३५० कट्टे कांदा आवक झाली असली तरी यातील ...

Lightly seasoned onion with onion | हलक्या प्रतीचा कांदा आल्याने व्यवहार ठप्प

हलक्या प्रतीचा कांदा आल्याने व्यवहार ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात बुधवारी तब्बल ३५० कट्टे कांदा आवक झाली असली तरी यातील थोडाच कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला़ शेतकऱ्यांनी आणलेला कांदा हा ओला आणि हलक्या प्रतीचा असल्याने दीड हजारापर्यंत भाव पडून पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापाºयांनी कांदा खरेदी केली़
दरम्यान बुधवारी बाजारात कांदा दर पडले असले तरी नंदुरबारसह जिल्ह्यातील इतर शहरी भागात कांदा थेट ५० ते ८० रुपये किलो दरापर्यंत विक्री होत असल्याचे दिसून आले होते़ यातून सामान्यांचे हाल सुरु असून पूरक व्यवसायातही कांद्याचा कमीत कमी वापर सुरु झाला असल्याचे चित्र दिसून आले आहे़
नंदुरबार बाजार समितीत गेल्या १५ दिवसांपासून कांद्याची आवक ही मर्यादित झाली आहे़ बुधवारी एका शेतकºयाने आणलेल्या कांद्याला प्रतीक्विंटल ६ हजार ५०० रुपयांचा भाव देण्यात आला़ उर्वरित शेतकºयांनी आणलेल्या कांद्याला ४ ते ५ हजार या दरम्यान दर देण्यात आले़ छोट्या आकाराचा कांदा असूनही व्यापाºयांनी त्याची खरेदी करुन बाजारात विक्रीसाठी रवाना केला़ सध्या नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून परराज्यात कांदा विक्रीला शेतकरी पसंती देत असल्याने येथील बाजारात चांगल्या दर्जाचा कांदाच येत नसल्याचे सांगण्यात आले आहे़ यामुळे दर कमी होण्याचे कोणतेही आसार सध्यातरी नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ साक्री तालुक्यातून होणारी कांदा आवकही पूर्ण बंद झाल्याने येथील व्यवहारांवर परिणाम झाला आहे़

४यंदा नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात साधारण २ हजार हेक्टरवर कांदा उत्पादन घेण्यात येत आहे़ अतीवृष्टी आणि अवकाळी यामुळे कांदा उत्पादकांचे वेळापत्रक कोलमडल्याने उत्पादनाला उशिर झाला आहे़ यातून कांदा दर वाढल्यानंतरही अनेक शेतकºयांना त्याचा लाभ उठवता आलेला नाही़ येत्या आठवड्यापासून कांदा आवक वाढणार असल्याची माहिती देण्यात येत आहे़ यातून दर काहीसे कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ तूर्तास जिल्ह्याच्या विविध भागातील हॉटेल व्यवसाय, छोटे मोठे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याकडून कांद्याऐवजी पाणकोबीचा वापर वाढवण्यात आल्याचे चित्र आहे़

Web Title: Lightly seasoned onion with onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.