रोगराई पसरण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:26 AM2021-01-09T04:26:27+5:302021-01-09T04:26:27+5:30
गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण होते. परंतु अचानक झालेल्या पावसाने पपई व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण होते. परंतु अचानक झालेल्या पावसाने पपई व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पिकांवर रोग येण्याची शक्यता वर्तविली जात असून, शेतकरी ही पिके वाचविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. तसेच आलेल्या पावसामुळे शहरात एकच धावपळ उडाली.
ढगाळ वातावरण व आलेल्या पावसामुळे सर्दी, खोकला व ताप यांसारखे आजार वाढण्याची भीती नाकारता येत नाही. हा पाऊस शहरासह ग्रामीण भागातदेखील झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने केळीची तोड बंद असल्याने झाडावरचे केळीचे घड पिकले असून, ती गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात भरीस भर म्हणून अचानक आलेला पाऊस शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारा ठरत आहे.