शहादा शहर आणि तालुक्यात जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:13 PM2019-08-05T12:13:03+5:302019-08-05T12:13:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पावसामुळे तालुका जलमय झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच तालुक्यातील नद्या, नाल्यांना पुर आल्याने नागरिकांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पावसामुळे तालुका जलमय झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच तालुक्यातील नद्या, नाल्यांना पुर आल्याने नागरिकांनी पुर पहाण्यासाठी गर्दी केली. पावसामुळे रस्ते बंद झाल्याने एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने ग्रामीण प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली होती़
रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहादा शहरातील अनेक रस्ते व वसाहतींमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़ डोंगरगांव रोड पूर्ण पाण्याखाली गेला, पटेल रेसिडेन्सी चौकात सुमारे गुडघाभर पाणी साचल्याने चोहोबाजुची वाहतूक ठप्प झाल होती़ दोंडाईचा रोडवर दर्गाजवळ तसेच स्टेट बँक चौकात, शासकीय विश्राम गृह परिसरातही पाणी साचल्यामुळे रहदारीची कोंडी झाली. जुना मोहिदा रोडवर देखील पाणी साचल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती़ शहरातील विकास कॉलनी श्रीराम कॉलनी अशा अनेक वसाहतींमध्ये पाणी साचले. अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली.
डोंगरगांव रोड, दोंडाईचा रोडवर पाण्याचे लोंढे येत असल्याने याठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती़ या गोमाई नदीला प्रथमच पुर आल्याने नागरिकांनी पुर पहाण्यासाठी पाडळदा पुलावर तसेच लोणखेडा व कुकडेल पुलावर गर्दी केली. मोठय़ा कालावधीनंतर गोमाई नदी दुथडी भरुन वाहत असल्याचे पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केल़े दरम्यान तालुक्यातील वैजाली, म्हसावद, ब्राrाणपुरी आदी गांवांमध्ये देखील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होत़े तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रशासन जागोजागी भेटी देत होत़े